Breaking News

Tag Archives: local bodies election

‘या’ नऊ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या १३ तारखेला प्रसिध्द राज्य निवडणूक आयोगाकडून दिले १३ ऑगस्टला प्रसिद्ध करण्याचे आदेश

ओबीसी आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आल्यानंतर आता राज्यातील महापालिकांसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्याची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरु केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील ९ महानगर पालिकांमधील निवडणूका घेण्याच्या अनुषंगाने मतदार याद्या प्रसिध्द करण्याचे आदेश दिले. तसेच या मतदार याद्यांवरील हरकती व सूचनाही घेण्याचा कार्यक्रमही …

Read More »

ओबीसी आरक्षण: दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मागील दोन वर्षापासून कोरोना आणि ओबीसी आरक्षणाचा इम्पिरिकल डेटा सादर केला गेला नव्हता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र महाराष्ट्र सरकार आणि सर्व राजकिय पक्षांनी आरक्षणाशिवाय निवडणूका घ्यायच्या नाहीत असा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या प्रमाणे थ्री टेस्ट पूर्ण करत बांठिया …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीला स्थगिती

महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरू असून या पार्श्वभूमीवर आज सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली. राज्य सरकारकडून बाठिंया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ट्रिपल टेस्टची पूर्तता केली. निवडणूक आयोगाला आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. पुढील सुनावणी १९ जुलैला होणार आहे. आज झालेल्या सुनावणीवेळी …

Read More »

भाजपा म्हणते, निवडणुका पुढे ढकला निवडणूक आयोगाकडे केली मागणी

राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून नदी – नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषदा, ४ नगर पंचायती व १५ ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने सोमवारी मुंबईत राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, आगामी निवडणूकीत २७ टक्के उमेदवार ओबीसीचे उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठका

ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतिक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक …

Read More »

नाना पटोले म्हणाले, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका राज्य सरकारने मध्यस्थी करण्याची मागणी

राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत अशी मागणी करत भाजपाप्रणीत नवीन सरकारने तात्काळ यात लक्ष घालून मध्यस्थी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्यात तत्कालीन …

Read More »

“या” जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणूका जाहिर; अर्ज मात्र ऑनलाईन राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाचा आदेश जारी

ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिकांसह ग्रामपंचायतीच्या निवडणूका स्थगित ठेवण्यात आल्या होत्या. तसेच ओबीसी आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याशिवाय या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्यायच्या नसल्याचेही तत्कालीन महाविकास आघाडीने जाहिर केले होते. मात्र राज्यात सत्तांतर होताच ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगर पंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम राज्य …

Read More »

अस्थिर राजकिय वातावरणात स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्टला मतदान

पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ६२ तालुकांत्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ५ ऑगस्ट २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान …

Read More »

नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या आरक्षणाची १३ जूनला सोडत राज्य निवडणूक आयोगाकडून आदेश

ओबीसी आरक्षणाबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच न्य़ायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश देत दोन आठवड्यात त्याची प्रक्रिया सुरु करण्याचे राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरु केली. काही दिवसांपूर्वी शहरातील महापालिकांच्या निवडणूका घेण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यापाठोपाठ …

Read More »

ओबीसींना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरक्षण लागू झालेले असेल तशी ऑर्डर घेण्याचा सरकारचा प्रयत्न- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

दिलीप वळसे पाटील

ओबीसी आरक्षणाबाबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पाठपुरावा करत आहेत. ओबीसींना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरक्षण लागू झालेले असेल तशी ऑर्डर घेण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू आहे. ओबीसींना आरक्षण मिळायला हवे हाच प्रयत्न सरकारचा आहे अशी स्पष्ट भूमिका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली. वाचा ओबीसीशिवाय “या” १४ …

Read More »