Breaking News

Tag Archives: high court

उच्च न्यायालयाचा निर्णयः शाळेतील एअर कंडिशनिंगचा खर्च पालकांनी उचलावा

शाळेतील एअर कंडिशनिंगचा खर्च पालकांनी उचलावा कारण ही सुविधा विद्यार्थ्यांना दिली जात आहे, जी प्रयोगशाळेच्या शुल्कासारख्या इतर शुल्कांपेक्षा वेगळी नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान दिला. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने वर्गातील वातानुकूलनासाठी दरमहा ₹ २,००० शुल्क आकारणाऱ्या खासगी शाळेविरुद्धची जनहित याचिका (पीआयएल) फेटाळून …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आश्चर्य, एपीएमसीच्या जमिनीवर ५ स्टार हॉटेल? गुजरात उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला

गुजरात उच्च न्यायालयाने कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC), सूरत यांना ५-स्टार हॉटेल बांधण्यासाठी आणि चालवण्यासाठी कथित गैरव्यवहार केलेल्या जमिनीचा लिलाव करण्याचे निर्देश दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (१९ एप्रिल) नकार दिला. जिल्हा मार्केट यार्ड बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनीचा लिलाव करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने योग्य असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने …

Read More »

न्यायालयामुळे नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेल्या उमेदवारांनी मानले मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार

‘ साहेब, तुम्ही आशेचा किरण होता आणि तुम्ही हा विश्वास सार्थ ठरवला. साहेब हा विजय केवळ तुमच्यामुळेच आणि तुमच्या प्रयत्नांमुळेच झाला आहे. यामुळे आमच्या कुटुंबामध्ये आनंद, समाधान परतले आहे,’ अशा शब्दांमध्ये एमपीएससी व अन्य भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मुख्यमंत्री शिंदे यांनीही या भावनांचा स्वीकार …

Read More »

नितीन देसाई आत्महत्या प्रकरण : ‘एडलवाईज’च्या अधिकाऱ्यांना अटकेची धाकधूक कायम अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाचा स्पष्ट नकार

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात ‘एडलवाईज’च्या अधिकाऱ्यांना अटकेची धाकधूक कायम आहे. उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या तिन्ही आरोपींनी अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्याबाबत गुरुवारी न्यायालयाला आग्रही विनंती केली. तथापि त्यांची ही विनंती मान्य करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आणि पुढील सुनावणी १२ सप्टेंबरला निश्चित केली. त्यामुळे आरोपींवर अटकेची टांगती तलवार कायम …

Read More »

पवना प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाची कार्यवाही होणार, पण न्यायालयाच्या आदेशानुसार मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

पवना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिन वाटप प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रकरण ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले असल्याने जमीन वाटपाची कार्यवाही करण्यात आलेली नाही. याप्रकरणी न्यायालयीन आदेश तपासून आणि निर्णयाचा आदर राखून काही मार्ग काढता येईल का, या संदर्भात शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री …

Read More »

औरंगाबाद नामांतराचा शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय उच्च न्यायालयात एक ऑगस्टला होणार उच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आपल्या अखेरच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात सत्तांतर होत बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले. या सरकारने उध्दव ठाकरेंच्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती देत त्यासंदर्भातील निर्णय नव्याने घेत तो राज्य …

Read More »

राज ठाकरेंच्या सभेविरोधात याचिका दाखल करणाऱ्यास एक लाखाचा दंड औरंगाबाद उच्च न्यायालयाने याचिका लावली फेटाळून

हनुमान जयंती दिवशी पुण्यात हनुमान मंदिरात जावून महाआरती केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादेत जाहिर सभा घेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विविध राजकिय पक्षांकडून सामाजिक संघटनांकडून राज ठाकरे यांच्या सभेला विरोध करत सभेला परवानगी देवू नका अशी मागणी केली. राज ठाकरे यांच्या सभेला दिलेली परवानगी रद्द करावी …

Read More »

राज्यातील न्यायालयांचे कामकाज आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा न्यायालयातही सुविधा राबविण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी न्यायालयांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायासह राज्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज व्हिडीओ काँन्फरन्सिंगद्वारा चालविण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. तसेच यासंदर्भातील सुविधा राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही महत्त्वाच्या प्रकरणांची …

Read More »