Breaking News

Tag Archives: gautam Adani

हिंडेनबर्ग संशोधन संस्था म्हणते, अदानी उद्योगाने खोट्या आकड्यांचा घेतला आधार पोलखोलनंतर अदानी उद्योगाच्या शेअर किंमतीत घट

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून गौतम अदानी यांच्या उद्योगाचा विस्तार गुजरातपासून संबध भारतभर आणि परदेशातही होत आहे. तसेच अदानी ग्रुपच्या मालमत्तेतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून गौतम अदानी यांचा नामोल्लेखही केला जात असतानाच हिंडेनबर्ग या संशोधन संस्थेने आपला एक अहवाल प्रसिध्द करत अदानी …

Read More »

‘ड्रायव्हर’च्या ट्रोलवरून रोहित पवार यांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले… स्वच्छ मनाने मैत्री असेल तर आम्ही खुल्या पद्धतीने करत असतो

नुकतेच देशातील आघाडीचे उद्योगपती तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जाणारे उद्योजक गौतम अदानी हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात गेले होते. त्यावेळी शरद पवार यांचे पुतणे आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गौतम अदानीच्या गाडीचे सारथ्य केल्याचे फोटो आणि …

Read More »

मुकेश अंबानींना मागे टाकून गौतम अदानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायनन्सच्या शेअर्स किंमतीत घट आल्याने बसला फटका

मराठी ई-बातम्या टीम गेल्या दोन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मंदीचे वातावरण असून, त्यामुळे रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. त्यामुळे मुकेश अंबानींच्या कमाईत मोठी घसरण झाली. परिणामी २५ जानेवारी रोजी गौतम अदानी यांनी कमाईच्या बाबतीत त्यांना मागे टाकले. आता अदानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल-टाइम नेट वर्थ …

Read More »

कमाईत अंबानी पडले मागे, गौतम अदानींच्या संपत्तीत ३.१५ लाख कोटींची वाढ अंबानींची कमाई ९८ हजार कोटी

मराठी ई-बातम्या टीम अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांच्या संपत्तीत २०२१ मध्ये ३.१५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर या काळात गुंतवणूकदार आणि उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी मुकेश अंबानींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ब्लूमबर्गच्या इंडेक्स रिपोर्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांची संपत्ती ६.८१ लाख कोटी रुपये आहे. संपूर्ण …

Read More »

गौतम अदानी आणि मुकेश अंबानींची बरोबरी दोघांकडे ६.६३ लाख कोटी रुपयांची संपत्ती

मुंबई: प्रतिनिधी अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आता मालमत्तेच्या बाबतीत समान पातळीवर आहेत. दोघांची मालमत्ता ६.६३-६.६३ लाख कोटी रुपये आहे. डॉलरमध्ये ती ८९ अब्ज डॉलर आहे. दोन बिझनेस टायकून आता आशियातील सर्वात श्रीमंत आणि समान पातळीवर आहेत. बुधवारी अदानी समूहाच्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल …

Read More »

गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत १४ व्या स्थानी पोहोचले संपत्ती ८१ अब्ज डॉलरवर समूह कंपन्यांचे मार्केट कॅप १० लाख कोटींच्या जवळ

मुंबई: प्रतिनिधी अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप वर्षभराच्या उच्चांकावर पोहोचले आहे. समूहाच्या एकूण ६ सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ९.९१ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. यामुळे समूहाचे मालक गौतम अदानी आता जगातील १४ व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. गेल्या ३ महिन्यांपासून अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. या कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची बातमी १४ जून रोजी आली होती. ज्यामध्ये असे म्हटले होते की परदेशी गुंतवणूकदारांचा कोणताही मागमूस नाही आणि अदानी शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्व विदेशी कंपन्या एकाच पत्त्यावर नोंदणीकृत आहेत. यानंतर या समूहाच्या सर्व शेअर्सच्या किमती प्रचंड घसरल्या होत्या. या घसरणीमुळे ३ जुलै रोजी समूहाचे एकूण मार्केट कॅप ७.०८ लाख …

Read More »

तुम्हाला माहित आहे का? गौतम अदानींच्या संपत्तीत रोज कितीने वाढ होते १ हजार कोटींची वाढ, पुन्हा बनले आशियातील दुसरे श्रीमंत

मुंबई : प्रतिनिधी अदानी समूहाचे मालक गौतम अदानी हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. सध्या त्यांची संपत्ती ५.०५ लाख कोटी रुपये आहे. एक वर्षापूर्वी त्यांची संपत्ती १.४० लाख कोटी रुपये होती. म्हणजेच गेल्या एका वर्षात त्यांची संपत्ती ३.६५ लाख कोटी रुपयांनी वाढली. ह्या एका वर्षात त्यांची संपत्ती दररोज …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंपनीच्या मालकी हक्कात बदल करण्यास मान्यता

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील सहार आणि छ.शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा जीव्हीके कंपनीने अदानी एअरपोर्टला हस्तांतरीत केल्यानंतर आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची ५० टक्के मालकीही आता अदानी समुहाकडे हस्तांतरीत करण्यात आली असून मालकी हक्क बदलास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सदरच्या मालकी बदलास केंद्रातील मोदी सरकारने यापूर्वीच मंजूरी दिल्याने …

Read More »

वीज बील माफीप्रश्नी राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, अदानी पवारांच्या घरी भेटीनंतरच वीज बील माफीवरून सरकारचे घुमजाव

ठाणे : प्रतिनिधी लॉकडाऊनमधील भरमसाठ वाढीव वीजबिल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहिर केला. नंतर मात्र बिल माफ करणार नसल्याचे जाहिर केले. परंतु ज्यावेळी हा निर्णय जाहिर केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी गौतम अदानी हे येवून गेल्याने वीज बील माफ करणार नसल्याचे सरकारने जाहिर केल्याचा गौप्यस्फोट …

Read More »