Breaking News

हिंडेनबर्ग संशोधन संस्था म्हणते, अदानी उद्योगाने खोट्या आकड्यांचा घेतला आधार पोलखोलनंतर अदानी उद्योगाच्या शेअर किंमतीत घट

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून गौतम अदानी यांच्या उद्योगाचा विस्तार गुजरातपासून संबध भारतभर आणि परदेशातही होत आहे. तसेच अदानी ग्रुपच्या मालमत्तेतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून गौतम अदानी यांचा नामोल्लेखही केला जात असतानाच हिंडेनबर्ग या संशोधन संस्थेने आपला एक अहवाल प्रसिध्द करत अदानी उद्योगावर खोट्या आकड्यांचा आधार घेत किंमत वाढविल्याचा आरोप केला. त्यामुळे अदानी उद्योगाच्या शेअर किंमतीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे शेअर बाजारात पहायला मिळत आहे.

तसेच या अहवालानंतर एका दिवसात अदानी उद्योग समुहाचा बाजारातील भांडवलाचा आकडा ८० हजार ०७८ कोटींचा फटका बसून १८ लाख ३७ हजार ९७८ कोटींवर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे २७ जानेवारी रोजी अदाणी उद्योग समूहाचे FPO बाजारात लाँच होत असतानाच हा अहवाल बाहेर आल्याने अदानी ग्रुपची मोठी अडचण झाली आहे.

न्यूयॉर्कमधील संशोधन संस्था Hindevburg Research संस्थेने गौतम अदानींच्या कंपन्यांवर बुधवारी गंभीर आरोप केले. अदाणींच्या कंपन्यांकडून शेअर मार्केटमध्ये हस्तक्षेप करण्यात येत असून गेल्या काही दशकांपासून त्यांच्याकडून अनेक फसव्या योजना जाहीर करण्यात आल्याचा आरोप हिंडनबर्ककडून अदानींवर करण्यात आला आहे.

या अहवालानंतर एकाच दिवसात अदानींना जागतिक श्रीमंतांच्या यादीत अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी मागे टाकलं आहे. याआधी अदानी ११९ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतक्या संपत्तीनिशी तिसऱ्या स्थानी होते. मात्र, १२० बिलियन डॉलर्स संपत्तीसह आता बेझोस तिसऱ्या स्थानी असून अदाणींची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. गेल्या तीन वर्षांत अदानींच्या संपत्तीमध्ये तब्बल ८१९ टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांगितलं जातं.

हिंडबनर्गच्या या खळबळजनक आरोपांनंतर बाजारात येऊ घातलेल्या अदाणींच्या FPO ला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २७ जानेवारी रोजी म्हणजेच शुक्रवारी अदाणी एंटरप्रायजेसकडून तब्बल २० हजार कोटींचे एफपीओ खुल्या बाजारात खरेदीसाठी लाँच करणार आहे. हा भारतातील सर्वात मोठा FPO असल्याचा दावा केला जातो. मात्र, त्याच्या दोन दिवस आधीच हिंडनबर्गनं हा आरोप केल्यामुळे या एफपीओला फटका बसू शकतो, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या अदानी ग्रुपकडून FPO ला टार्गेट करण्यासाठीच हे आरोप करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून अदानी एंटरप्रायजेसच्या FPO चं नुकसान करण्याच्या एकमेव उद्देशाने अदानी समूहाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे. मात्र, गुंतवणूकदारांनी नेहमीच अदानी उद्योग समूहावर आपला विश्वास व्यक्त केला असल्याचे स्पष्टीकरण अदानी समूहाकडून जारी करण्यात आले.

हिंडेनबर्गकडून अहवाल जारी होताच अदानी समुहाच्या शेअर किंमतीत झालेली घट खालीलप्रमाणे…
अदानी ग्रीन एनर्जी : १८५५.४५ ५८.१० (-३.०४ टक्के)
अदानी टोटल गॅस ३७४५ -१४०.४५ (-३.६१ टक्के)
अदानी विल्मर ५४४.५० -२८.५० (-५.०० टक्के)
अदानी ट्रान्समिशन २५३४.१० -२२२.१० (-८.०६ टक्के)
अदानी पोर्ट्स ७१२.९० -४७.९५ (-६.३० टक्के)
अदानी इंटरप्रायझेस ३३८९.९५ -५२.९० (-१.५४ टक्के)
अदानी पॉवर २६१.१० -१३.७० (-४.९९ टक्के)

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *