Breaking News

Tag Archives: finance minister ajit pawar

सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी तर पाईपद्वारे गॅस प्रति एससीएम ३.५० रुपयाने स्वस्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हॅट कमी केल्यामुळे राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नैसर्गिक वायुवरील करात थेट १०.५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार यासंदर्भातील आदेश जारी करत आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली असून मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात …

Read More »

२ लाख २० हजार छोटे- इतर व्यापाऱ्यांना होणार फायदा, ‘या’ योजनेचा लाभ घेतल्यास “महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड - २०२२ योजने”ची अधिसूचना जारी

कोरोनाकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या आणि विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – २०२२’ या अभय योजनेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचना जारी झाल्याने राज्यातील उद्योग, …

Read More »

केंद्रापाठोपाठ राज्याचीही सरकारी कर्मचाऱ्यांना गुढी पाडवा भेटः महागाई भत्त्यात वाढ केंद्राप्रमाणे राज्यातही ३ टक्के वाढ

अवघ्या काही दिवसांवर नव हिंदू वर्ष सुरु होणार असून या नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेत ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून …

Read More »

सीएनजी आणि पाईपलाईन गॅस वापरणाऱ्यांना दिलासा: १ एप्रिलपासून मिळणार स्वस्तात ‘सीएनजी’ वरील व्हॅट १३.५ ऐवजी आता ३ टक्के झाल्याने राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; १ एप्रिलपासून नवे दर

राज्याचा २०२२-२३ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात सीएनजी गॅस वाहनधारक आणि पाईपलाईनद्वारे गॅसवरील व्हॅट दरात घट करण्याची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी १ एप्रिल २०२२ पासून सुरु करण्यात येत असून यासंबधीचे गॅजेटमध्ये प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून राज्यात सीएनजी गॅस …

Read More »

व्यापाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केली “ही” अभय योजना ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड - २०२२’ अभय योजना

कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – २०२२’ अभय योजना आज विधिमंडळात जाहीर केली. कर कायद्यातंर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये १० हजार रुपयांची थकबाकी असल्यास सदर थकबाकीची रक्कम संपूर्णपणे माफ …

Read More »

अजित पवारांची मोठी घोषणाः खाजगी विमा कंपन्यांना मोठे करायचे नाही राज्यावर आलेल्या संकटावर मात करुन राज्याला नेटाने पुढे नेण्याचे काम केले - अजित पवार

मागील वर्षभरात राज्यातील शेतकऱ्यांवर जवळपास दोन ते तीन वेळा अस्मानी संकट आले. मात्र या संकटात विमा उतरवूनही शेतकऱ्यांना फारसा परतावा मिळाला नाही. त्यामुळे राज्य सरकार आणि शेतकरी दोघे मिळून फक्त विमा कंपन्यांना मोठे करायचे काम सुरु आहे की काय अशी शंका येत आहे. मात्र आता विमा कंपन्यांना मोठे न करता …

Read More »

अजित दादांचा विरोधकांना टोला तर आमदार, पीए आणि चालकांसाठी दिली खुषखबर येड पांघरूण पेडगावला जायचं होतं' की त्यांचा 'अभ्यास कमी होता' म्हणून अर्थसंकल्पावर टिका

इकडच्या तिकडच्या योजना आणल्या… केंद्रातीलच योजना या अर्थसंकल्पात होत्या असं विरोधी पक्ष बोलत होते… मला कळत नाही यांना ‘येड पांघरूण पेडगावला जायचं होतं’ की त्यांचा ‘अभ्यास कमी होता’ म्हणून अर्थसंकल्पावर टिका करत होते असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लगावला. अर्थसंकल्पावरील चर्चेवर उत्तर देताना अजित पवार यांनी …

Read More »

अजित पवारांचा काश्मीर फाईल्स चित्रपटावरून भाजपाला टोला केंद्रानेच करमुक्त करावा म्हणजे तो सबंध देशभरात निर्णय लागू होईल

काश्मीर मधील एकंदर परिस्थितीवर आधारीत काश्मीर फाईल्स हा चित्रपट नुकताच रिलीज झाला या चित्रपटाबाबत दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केल्याने या चित्रपटाला महाराष्ट्रातही करमुक्त करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात येत होती. तोच धागा पकडत मागील तीन दिवसापासून अर्थसंकल्पावरील चर्चेला आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना म्हणाले की, …

Read More »

आणि अर्थसंकल्पावरून फडणवीसांनी केले अजित पवारांचे कौतुक विधानसभेत अर्थसंकल्पिय चर्चेवेळी केले कौतुक

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्पातील तरतूदींवरून आणि त्यातील युनिक कल्पनांवरून विरोधकाकडून अर्थमंत्र्यांचे कौतुक केल्याची घटना घडली आहे. वास्तविक पाहता राजकिय वर्तुळात त्यातही विशेषतः सत्ताधारी आणि विरोधकांकडून एखाद्या तरतूदीवरून किंवा बाबीवरून विधिमंडळाच्या सभागृहात कौतुक करण्याची घटना तुरळकच असते. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. अजित …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पंचसूत्रीच्या अंमलबजावणीतून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प

कोरोना संकटावर मात करून राज्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प आज राज्य विधीमंडळात सादर झाला असून यात निश्चित करण्यात आलेल्या विकासाच्या पंचसूत्रीमुळे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्याचे उद्दिष्ट पूर्णत्वाला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यांनी अर्थसंकल्पातून कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग क्षेत्राच्या विकासाला बुस्टर …

Read More »