Breaking News

सीएनजी आणि पाईपलाईन गॅस वापरणाऱ्यांना दिलासा: १ एप्रिलपासून मिळणार स्वस्तात ‘सीएनजी’ वरील व्हॅट १३.५ ऐवजी आता ३ टक्के झाल्याने राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; १ एप्रिलपासून नवे दर

राज्याचा २०२२-२३ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात सीएनजी गॅस वाहनधारक आणि पाईपलाईनद्वारे गॅसवरील व्हॅट दरात घट करण्याची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी १ एप्रिल २०२२ पासून सुरु करण्यात येत असून यासंबधीचे गॅजेटमध्ये प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून राज्यात सीएनजी गॅस आणि पाईपलाईनद्वारे मिळणार गॅस स्वस्त होणार आहे.

उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे १ एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असून याचा फायदा ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर १ एप्रिल २०२२ पासून लागू होणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या ‘सीएनजी व्हॅट’ कपात निर्णयाचा टॅक्सी, ऑटो, प्रवासी वाहतूकदारांसह सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. तर राज्यात सीएनजी इंधन स्वस्त झाल्याने वातावरण प्रदुषण नियंत्रणासही मदत होणार आहे. आजस्थितीला मुंबईसह पुणे येथील इंधनावरील वाहनांची संख्या जास्त असली तरी पाईपलाईनद्वारे गॅस घेणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी आहे.

या निर्णयामुळे विशेषत: मुंबई, पुणे सारख्या शहरातील प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच व्हॅट दरात कपात केल्यामुळे गॅस वाहनधारकांच्या खिशाला लागणाऱ्या कात्रीत बचत होणार आहे. याशिवाय पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस वापरणाऱ्यांच्या खर्चातही बचत होणार आहे.

Check Also

मुंबई काँग्रेस म्हणते, सर्व आगामी निवडणुकांमध्ये EVM मशीन ऐवजी Ballot Paper चा वापर करा भाई जगताप यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

वर्ष २०१६ ते २०१९ या कालावधीत, नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात देशभरातून सुमारे १९ लाख …

Leave a Reply

Your email address will not be published.