Breaking News

Tag Archives: devendra fadnavis

बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी झोपडीधारक, स्टॉलधारक यांची पात्रता निश्चित राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बीडीडी चाळ परिसरातील अनिवासी झोपडीधारक, स्टॉलधारक यांची पात्रता निश्चित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मुंबईतील वरळी, नायगाव, ना.म. जोशी मार्ग व शिवडी येथे एकूण २०७ चाळी आहेत. या चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये एकूण १५ हजार ५८४ भाडेकरूंचे पुनर्वसन …

Read More »

उद्योग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ठरलं, या ६ जिल्ह्यातील गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता १ लाख २० हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्य

महाराष्ट्रात येवू घातलेले उद्योग शेजारच्या गुजरात तसेच भाजपा शासित राज्यात जात असल्याची ओरड विरोधकांकडून होत असताना बुधवारी पार पडलेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या विशाल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. हे प्रकल्प पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई याभागात होणार असून यामुळे …

Read More »

अर्थसंकल्पिय अधिवेशातील म फुले जनआरोग्य योजनेच्या उत्पन्न मर्यादेच्या घोषणेला आज मुर्तू स्वरूप राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणार आरोग्य प्रती कुटुंब दीड लाखावरून पाच लाख रूपयांचे कवच

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रूपयांवरून ५ लाख रूपये एवढे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थ व्यवस्थेची माहिती पोहोचवा

मोदी सरकारच्या ‘गरीब कल्याण’ कार्यक्रमातून गरीबांचे उंचावलेले जीवनमान, सर्वसमावेशक विकासामुळे जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी भारताची अर्थव्यवस्था याची माहिती भाजपा कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सामान्य माणसांपर्यंत घरोघरी जाऊन पोहचविली पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. भोपाळ येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १० लाख बूथ वरील कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. …

Read More »

बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी आता आषाढ एकादशीला

राज्य शासनाने यंदाच्या वर्षात शासकीय कार्यालयांना बकरी ईद (ईद-उल-झुआ) या सणासाठी गुरुवार दि. २९ जून २०२३ रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे. राज्य शासनाने सन २०२३ मध्ये राज्य शासकीय कार्यालयांना एकूण २४ सार्वजनिक सुट्या अधिसूचित केल्या आहेत. सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये बकरी ईद (ईद-उल-झुआ) …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा प्रत्युत्तर, शरद पवार म्हणाले ते खरं आहे, पण… शरद पवारांच्या वक्तव्यावरून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर

राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलेला असताना आता देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातही तसेच दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. आधी देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना मुत्सद्देगिरीवरून टोला लगावल्यानंतर त्यावर शरद पवारांनी फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला होता. आता माध्यमांशी बोलताना पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना खोचक शब्दांत …

Read More »

फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर शरद पवार यांचा पलटवार, हे ही त्यांच अज्ञानच… मी सर्वांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं होतं, तेव्हा फडणवीस शाळेत असतील

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमेकांवर टोलेबाजी चालू असताना दुसरीकडे फडणवीसांनी शरद पवारांविषयी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. चंद्रपूरमध्ये मोदी सरकारच्या ९ वर्षपूर्तीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्र सोडलं. यावेळी …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची टीका, भाजपाचा डिएनच ओबीसी, तर राष्ट्रवादीला केवळ….

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू आहे. पक्ष संघटनेत जबाबदारी मिळावी, अशी इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली. यानंतर प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्यांना मिळावं, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्र सोडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षात केवळ चेहरे दाखवण्यासाठी ओबीसी हवे …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांच्या बैठकीवर टीका, ही तर परिवार बचाव…

बिहारच्या पाटणा शहरात आगामी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी सर्व राजकिय विरोधक एकत्र आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांची मोट बांधत आहेत. देशभरातील १५ हून अधिक पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे …

Read More »

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचे निर्देश, राज्यात दोन्ही योजनांचे एकच कार्ड करा

केंद्राची आयुष्यमान भारत योजना व राज्य शासनाची महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना नागरिकांचा आरोग्यावरील खर्च उचलतात. राज्यातील नागरिकांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्यात यावा. यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची समन्वयातून अंमलबजावणी करावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज दिल्या. सह्याद्री अतिथिगृहात आज आयुष्यमान …

Read More »