Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा प्रत्युत्तर, शरद पवार म्हणाले ते खरं आहे, पण… शरद पवारांच्या वक्तव्यावरून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर

राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलेला असताना आता देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातही तसेच दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. आधी देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना मुत्सद्देगिरीवरून टोला लगावल्यानंतर त्यावर शरद पवारांनी फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला होता. आता माध्यमांशी बोलताना पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यावरून शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा टोला लगावत म्हणाले, शरद पवार म्हणाले, ते खरं आहे की १९७७ मध्ये मी प्राथमिक शाळेतच होतो. पण मी काल जे बोललो, ते एकतर शरद पवारांनी ऐकलं नाही किंवा ऐकलं तरी ते त्यांना अस्वस्थ करणारं होतं. म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला, असं म्हणाले.

१९७८ साली शरद पवारांनी वसंतदादा पाटलांबरोबर ते मंत्री होते. त्यावेळी काँग्रेस पक्ष फोडला. त्यातले ४० लोक बाहेर काढले आणि भाजपाबरोबर त्यांनी सरकार तयार केलं. आता एकनाथ शिंदे तर आमच्याबरोबरच निवडून आले होते. ते तिथून ५० लोक घेऊन बाहेर पडले. त्यांनी आमच्याबरोबर सरकार स्थापन केलं. मग शरद पवारांनी तयार केलेलं सरकार ही मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी तयार केलेलं सरकार ही बेईमानी कशी होऊ शकते? मी कुठेही शरद पवारांनी बेईमानी केली असं म्हटलं नाही. एकनाथ शिंदेंची केस तर मेरिटची आहे. एकनाथ शिंदे आमच्याबरोबर युतीत निवडून आले. शरद पवार तर काँग्रेसबरोबर निवडून आले होते आणि नंतर भाजपाबरोबर आले, याची आठवणही करून दिली.

तसेच देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझं म्हणणं एवढंच आहे की मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, त्यामुळे इतिहास बदलत नाही. कुणीही जन्माला आलं, नाही आलं, कधी आलं यावर इतिहास ठरत नसतो. इतिहासात हे लिहून ठेवलं आहे की शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ४० लोकांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं आणि भाजपाबरोबर सरकार तयार केलं. तेच मी सांगितलंय, असा मुद्दा मांडत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *