Breaking News

Tag Archives: cpi

कॉम्रेड विनोद निकोले म्हणाले, वाढवण बंदराला या ८ मुद्यांमुळे स्थानिकांसह आमचाही विरोध

पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असल्याने आमचाही विरोधच असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी नुकतेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी आमदार निकोले म्हणाले की, वाढवण बंदर …

Read More »

कॉम्रेड कुमार शिराळकर : एक मौल्यवान अष्टपैलू हिरा शिराळकर यांच्या निधनानिमित्त कॉ. डॉ. अशोक ढवळे लिहिलेला खास लेख

कॉम्रेड कुमार शिराळकर यांच्या जाण्याने केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नव्हे, तर महाराष्ट्राच्या समग्र डाव्या आणि परिवर्तनवादी चळवळीने एक मौल्यवान अष्टपैलू हिरा गमावला आहे. गेल्या ४० वर्षांचा एक सच्चा कॉम्रेड आणि मित्र मी गमावला आहे. वर्गसंघर्षातून क्रांतिकार्याकडे विधायक कार्यातून क्रांतिकारक कार्याकडे झालेल्या कुमार यांच्या प्रवासातून त्यांची संवेदनशीलता आणि अन्याय्य व्यवस्थेबद्दलची चीड …

Read More »

ठाकरे सेनेवर आता लाल रंगाची झालर!

हिंदुत्व हीच ताकद असलेल्या शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर करण्याचा व्यापक कट हिंदुत्वविरोधी राजकीय नेत्यांनी आखला आहे. कम्युनिस्टांनी दिलेला पाठिंबा हा त्या कटाचाच एक भाग असून आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना या कटात पुरती फसली आहे. शिवसेनेचा भगवा रंग आता लाल झाला आहे, अशी टीका प्रदेश भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये …

Read More »

शिंदेच्या बंडावर शरद पवार पहिल्यांदाच म्हणाले, कोणता राष्ट्रीय पक्ष हे सांगायची गरज नाही… राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर पहिल्याच शरद पवार यांनी जाहिर केली भूमिका

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे अल्पमतात आलेले महाविकास आघाडी सरकार कसे वाचावायचे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षाच्या नेत्यांची आज बैठक बोलावली. या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकिय संकटावर मात करण्याबाबत चर्चा करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. त्यानंतर पक्षाच्या झालेल्या बैठकीतील निर्णयाची माहिती …

Read More »

आरबीआयने निश्चित केलेला दराचा टप्पा महागाईने ओलांडला खाद्य तेल, खाद्य महागाई आणि किरकोळ महागाई दर आतापर्यंतचा सर्वाधिक

कोरोनानंतर पेट्रोल-डिजेल आणि गॅसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत करण्यात येत असल्याने त्याचा परिणाम जीवनाश्यक वस्तू, भाजीपाला, साबण, खाद्य पदार्थ, खाद्य तेल आदींच्या किंमतीतही वाढ होत असल्याने संपूर्ण देशभरातील जनता महागाईने चांगलीच होरपळून निघत आहे. विशेष म्हणजे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्धारीत केलेल्या महागाईच्या दराचा टप्पाही ओलांडला गेला आहे. …

Read More »

डाव्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा स्वतंत्र अजेंडा आझाद मैदानावर दोन्ही पक्षांचे मर्यादीत कार्यकर्त्ये हजर

मुंबईः विशेष प्रतिनिधी केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात डाव्या पक्षांच्या जवळपास सर्वच संघटनांनी एकत्रित येत मोर्चा काढला. या मोर्चात आदिवासी, कातकरी आणि शेतमजूरांचा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. मात्र या मोर्चाचे सारे श्रेय मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःचे फारसे कार्यकर्त्ये न आणता श्रेय लाटल्याचे चित्र आजच्या सर्वच घटनांवरून दिसून येत …

Read More »

पवार लागले कामाला २१ मे ला भाजप आघाडीतेर पक्षांची दिल्लीत बैठक

मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पुन्हा एकदा संधी मिळू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा हे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी २१ मे रोजी देशातील रालोआचे घटक पक्ष नसलेल्या आणि धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या पक्षांची दिल्लीत बैठक बोलाविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका बड्या नेत्यांने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. …

Read More »