Breaking News

Tag Archives: covid-19

रूग्ण सापडल्यानंतर मंत्रालय आणि प्रशासकिय इमारत दोन दिवसांसाठी बंद निर्जंतुकीकरणासाठी बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची लागण मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना होवू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरकारला अखेर मंत्रालयातच या विषाणूची लागण झालेले रूग्ण सोमवारी सापडले. त्या विषाणूचा प्रादुर्भाव इतरांनाही होवू नये यासाठी मंत्रालय, नवीन प्रशासकिय इमारतीत निर्जंतुकीकरण करण्यासाठी दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २९ आणि ३० एप्रिल या दोन …

Read More »

आपला फोकस कोरोनाच्या लढाईवर…त्यांच्याकडे रिकामा वेळ असेल खासदार सुप्रिया सुळे यांचे विरोधकांवर टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी कुठल्याही राजकीय विषयाबद्दल कुठलीही आता अस्थिरता आणणं हे अशा काळात योग्य नाही. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाई आपण कॉमन अजेंडा करुन लढली पाहिजे. दरम्यान आपला फोकस कामावर असला पाहिजे हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सांगतात त्याप्रमाणे आपला फोकस कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी असायला हवा. ज्यांना टिका करायची असेल त्यांना करु द्या …

Read More »

१ कोटी ७७ लाख लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या टिकटॉक कडून ५ कोटी कंपनीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊन काळात समाजमाध्यमातून लोकांशी संवाद साधल्यानंतर पुन्हा विविध माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी टिकटॉक अॅपचा फायदा झाला असून अल्पावधीतच १ कोटी ७७ लाख नागरिकांपर्यत सहजरित्या पोहोचता आले. त्याच टिकटॉक कंपनीने राज्याच्या कोविड विरोधी लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ कोटी रूपयांची मदत दिली. …

Read More »

आज पुन्हा थोडीशी संख्या वाढली राज्यात ८ हजार ५९० वर पोहोचले रूग्ण तर मुंबईत ५ हजार ७७६

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत काल रविवारच्या तुलनेत आज पुन्हा वाढ झाली असून मागील २४ तासात ५२२ रूग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईतील रूग्णांची संख्या आज ५ हजार ७७६ वर पोहोचली असून तब्बल २७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंत १२८२ रूग्ण बरे होवून घरे गेल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री …

Read More »

बँकानो, शेतकरी थकबाकीदार नाही कर्ज द्या केंद्रामार्फत आरबीआयला विनंती करण्याचा राज्य मंत्रिमंडळात निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मधील पात्र परंतु सध्या निधी अभावी लाभ मिळू न शकलेल्या खातेदारांना बँकांनी थकबाकीदार न मानू नये. तसेच त्यांना खरीप २०२० साठी नवीन पिक कर्ज द्यावे अशी विनंती केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँकेस करण्याचा निर्णय झाला. कोविडमुळे …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीसाठी मंत्रिमंडळाची राज्यपालांना पुन्हा विनंती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यावर कोरोनाचे संकट असताना साधारणत: १० दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राज्य मंत्रिमंडळाने प्रस्ताव पाठवित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सध्या रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त जागेवर नियुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर अद्याप निर्णय न घेण्यात आल्याने राज्यपालांना मंत्रिमंडळाच्यावतीने पुन्हा एकदा विनंती करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या …

Read More »

मंत्रालयात सापडले कोरोनाग्रस्त रूग्ण भाजपा नेत्याच्या क्रिस्टल कंपनीकडे कंत्राट

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या शासकिय कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे या रूग्णांना मंत्रालयातून पुढील उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. शासकिय कर्मचाऱ्यांचेही कोरोना विषाणूपासून संरक्षण व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने कर्मचाऱ्यांची संख्या ५ टक्केवर आणली आहे. तसेच …

Read More »

अन्यथा रूग्णालयांवर कारवाईशिवाय पर्याय नाही संख्या ६० वर नेणार: पीपीई कीट, मास्क राज्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे खाजगी हॉस्पिटल्स बंद असून डायलीसीससारख्या रुग्णांची परवड होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी मुंबई, पुणे शहरातून जास्त प्रमाणात येत आहेत इतर भागातून नाहीत परंतु मुख्यमंत्र्यासह आम्ही सर्वांनी खाजगी हॉस्पिटल्सना मानवतेच्यादृष्टीने सेवा चालू ठेवण्याचे आवाहन केलेले आहे अशा स्थितीतही खाजगी हॉस्पिटल्स सुरु नाही केली …

Read More »

तुम्ही आमच्यासाठी बाहेर तर आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर ठाणे शहरातील नवतरूणांकडून असाही मदतीचा हात

ठाणे: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच या लॉकडाऊनमुळे अनेकांवर रोजगार बंद झाल्याने घरात बसण्याची वेळ आली. मात्र अशा परिस्थितीत नागरिकांसाठी झटणाऱ्या पोलिस, होमगार्ड आणि कष्टकरी वर्गाला दोन वेळचे घास सुखाने खाता यावेत यासाठी शहरातील परिक्षित धुमे आणि त्याची मित्रमंडळी तयार जेवणाचे पाकिट्स आणि अन्न …

Read More »

पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आणखी एक पाऊल

मुंबई: प्रतिनिधी पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून त्यांच्या निर्देशानुसार चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अनिल कवडे,सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर यांचा समावेश आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि …

Read More »