Breaking News

Tag Archives: covid-19

पालकमंत्री मलिक म्हणाले, परभणीकरांनो कोरोनामुक्त झाल्याबद्दल अभिनंदन पुढेही कोरोनामुक्तच राहिल असा विश्वास

परभणी: प्रतिनिधी कोरोना बाधित रुग्णाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने परभणी जिल्हा अखेर कोरोनामुक्त झाला आहे. यासाठी मेहनत घेणार्‍या सर्व यंत्रणांचे अल्पसंख्याक मंत्री आणि परभणी जिल्हयाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आभार मानतानाच यंत्रणेने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले आहे. सुरुवातीपासूनच परभणी जिल्हा कोरोनामुक्त होता मात्र एक कुटुंब पुण्यातून आल्यावर त्यातील एकाचा अहवाल …

Read More »

आम्ही बेरोजगार होतो, पण आता आम्ही देणारे आहोत अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजनेतून यशस्वी झालेल्या तरुणांकडून कोरोना संकटग्रस्तांना मदत

मुंबई : प्रतिनिधी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्यावसायिक कर्ज घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिलेले अनेक तरुण आता स्वयंपूर्ण झाले असून कोरोनाच्या संकटात ते आता इतरांना मदत करीत आहेत. काही काळापूर्वी बेरोजगार असलेल्या या तरुणांना महामंडळाने कर्जाच्या रुपाने मदतीचा हात दिला आणि त्यांना व्यवसाय करण्यास प्रेरीत केले. व्यवसायात यशस्वी …

Read More »

पंतप्रधान मोदींचे भाकित, कोरोनाला सोबत घेवून चालावे लागणार मुख्यमंत्र्यांबरोबरील आजच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सूचनांचा पाऊस

मुंबई-नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात आपण दोनवेळा लॉकडाऊन केला. या काळात आलेले अनुभव आणि प्रश्नांचे मुल्यांकन करून कोणत्या शहरात, भागात लॉकडाऊनची गरज आहे याबाबतची माहिती घेवून राज्य सरकारांनी लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा असे सांगत आपल्या सोबत कोरोना बराच काळ राहणार असल्याचे अशी भाकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

शनिवारच्या तुलनेत ५० टक्क्याने संख्या कमी, पण ८ हजाराचा टप्पा ओलांडला राज्यात ८०६८ वर पोहोचली संख्या: १९ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत काल शनिवारी अचानक ८ चा टप्पा पार केल्यानंतर सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यातच आज रविवारी या संख्येत पुन्हा कितीने वाढ होती याबाबत भीतीचे वातावरण होते. मात्र गेल्या २४ तासात कोरोनाचे रूग्ण निदानाचे संख्या ५० टक्क्याने कमी होत ४४० रूग्णांचे निदान झाले. तर १९ …

Read More »

शरद पवार म्हणाले पंतप्रधानांना राज्यासाठीही पॅकेज द्या अन्यथा… राज्याला एक लाख कोटी रूपयांची आर्थिक मदत देण्याचे आवाहन

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील सर्व राज्यांनी लॉकडाऊन केले आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. एकट्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा ३ लाख ४७ हजार कोटी रूपयांचा आहे. मात्र लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत १ लाख ४० हजार कोटी रूपयांची महसूली तूट येणार असल्याने …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंकडून गडकरींना धन्यवाद देत बाकीच्यांना लगावला टोला ३ मे नंतर लॉकडाऊनबाबत परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेणार असल्याची स्पष्टोक्ती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनासारख्या संकटकाळात पक्षबाजूला ठेवून राज्य सरकारसोबत या संकटाचा मुकाबला करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींजी आपण केलात. या आवाहनाबद्दल तुमचे खरेच धन्यवाद. मात्र अशा संकटसमयीही इतर जे कोणी घाणेरडे राजकारण करत आहेत, त्यांना यामुळे काही काळ तरी वेळेचे भान येईल अशी अपेक्षा व्यक्त करत भाजपा नेत्याकडून राज्यात …

Read More »

पब्लिक युटीलीटी सर्व्हिसेस…. बँकींग क्षेत्र या कायद्यावरून निर्माण करण्यात आलेल्या चित्राचा भांडाफोड

बँकिंग ला पब्लिक युटीलीटी सर्व्हिसेस म्हणून पुढिल सहा महिण्यासाठी घोषीत करण्यात आले आहे. हि बातमी देतांना सर्व प्रसारमाध्यमांनी सांगितले की यामुळे आता बँक कर्मचारी संप करू शकणार नाहीत. अशाप्रकारे बातम्या देऊन मिडीया जाणीवपूर्वक बँकिंग मधिल अधिकारी व कर्मचारी यांची निगेटिव्ह छबी समाजापुढे उभी करीत आहेत. खरंतर गेली तीस – चाळीस …

Read More »

महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आज ८११ रूग्णांचे निदान तर संख्या ७ हजार ६२८ वर पोहोचली

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या आजाराला रोखण्यासाठी एकाबाजूला राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असताना दुसऱ्याबाजूला या विषाणूने नियंत्रणात यायचे नाव काही घेत नसल्याचे दिसून येत आहे. या चालू आठवड्यात दुपट्टीने रूग्णांच्या संख्येत वाढ होण्याच्या घटना आतापर्यंत तीनवेळा घडल्या. मात्र आज दुपटीहून अधिक रूग्णांचे राज्यात निदान झाल्याचे आढळून आले …

Read More »

सोलापूरातील या गावात सापडला कोरोना रूग्ण ग्रामीण भागातही लोण पसरण्याची भीती

सोलापूर: प्रतिनिधी आतापर्यत फक्त शहरीभागात असणारा कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही पसरत असल्याचे दिसून येत आहे. या विषाणूचा रूग्ण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घेरडी गावात पहिला आढळून आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या ५० वर पोहोचली असून सर्वाधिक रूग्ण पाच्छा पेठ (१९ रूग्ण) येथील आहेत. …

Read More »

फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांच्या हाती पैसा देण्यासाठी या गोष्टी करा कापूस, तूर, चणा खरेदी केंद्रे सर्वत्र सुरू करण्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असले तरी शेतमाल खरेदीला केंद्र सरकारने सूट दिलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा खरेदीची घोषणा केली असली तरी अतिशय तुरळक ठिकाणी खरेदी केंद्र सुरू असल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे कापूस, तूर, चणा खरेदीकेंद्र मोठ्या प्रमाणात सुरू करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र आज …

Read More »