Breaking News

सोलापूरातील या गावात सापडला कोरोना रूग्ण ग्रामीण भागातही लोण पसरण्याची भीती

सोलापूर: प्रतिनिधी
आतापर्यत फक्त शहरीभागात असणारा कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही पसरत असल्याचे दिसून येत आहे. या विषाणूचा रूग्ण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घेरडी गावात पहिला आढळून आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापूर शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या ५० वर पोहोचली असून सर्वाधिक रूग्ण पाच्छा पेठ (१९ रूग्ण) येथील आहेत. त्यानंतर शास्त्री नगर (रूग्ण ६), इंदिरा नगर ७० फुट रोड (४ रूग्ण), जोशी गल्ली (२ रूग्ण), मसिहा चौक (रूग्ण २) , बापूजी नगर (५ रूग्ण), कुर्बान हुसेन नगर (२ रूग्ण) , जगन्नाथ नगर (१ रूग्ण), शिवगंगा नगर (नई जिंदगी) (१ रूग्ण), मदर इंडिया झोपडपट्टी (२ रूग्ण), भद्रावती पेठ (१ रूग्ण), शनिवार पेठ (१ रूग्ण), लष्कर (सदर बझार) (२ रूग्ण), मोदी खाना (१ रूग्ण) आदी सापडले. विशेषत: यातील बहुतांश भाग हे झोपडपट्टी भागात मोडणारे आहेत.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *