Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

खुषखबर : फक्त शेवटच्या सत्राची परिक्षा होणार : नवे वर्ष १ सप्टेंबरपासून अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राच्या महाविद्यालयीन परीक्षा जुलैमध्ये होणार - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सध्या लॉकडाऊन कालावधी सुरू आहे. त्या अनुषंगाने युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाला सादर केला. त्यानुसार सर्व पदवी व पदव्युत्तर कोर्सच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या १ जुलै ते ३० जुलै …

Read More »

साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची कोरोना विरोधी लढ्याला मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख २१ हजारांचा सहभाग

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र आज कोरोना विषाणू संसर्गाशी लढत आहे. कोरोना आजारावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अश्या गंभीर परिस्थितीत प्रत्येकाने प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे असे मत व्यक्त करून अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीदिनी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, जेष्ठ साहित्यीक आणि हरित …

Read More »

गावांमध्ये ४५ हजार स्वच्छताग्रहींची नियुक्ती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोविडग्रस्त जिल्ह्यांमध्ये स्वच्छाग्रहींची नियुक्ती करण्यात आली असून आधीच नियुक्त झालेल्या स्वच्छागृहींना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. राज्यातील २७ हजार ७८६ ग्रामपंचायतीमध्ये ४० हजार ५०१ गावांमध्ये ४५ हजार स्वच्छाग्रही लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे काम करीत आहेत. या स्वच्छाग्रहींच्या सुरक्षा साधन खरेदीसाठी प्रत्येक जिल्ह्यास १० लाख रूपयांचा निधी प्रदान …

Read More »

कामगारांसाठी जास्तीच्या रेल्वे सोडणार मात्र जीवावर उदार नका होवू मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या मृत मजुरांच्या कुटुंबियांना ५ लाख- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दू:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश देत परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी …

Read More »

कालचा विक्रम मोडत आज १३६२ रूग्णांची वाढ राज्याची संख्या १८ हजारावर पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनोग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याच्या संख्येत आजही खंड पडलेला नाही. काल १२३३ रूग्ण आढळून आले होते. त्यात आज १४० ने वाढ होत ही संख्या १३६२ वर पोहोचली असून राज्यातील रूग्णांची संख्याही १८ हजार पार पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सामाजिक माध्यमातून संवाद साधताना …

Read More »

कोरोनाविरोधी लढ्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी घडवून आणली सर्वपक्षिय एकजूट विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची तत्काळ दखल

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करूत असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता ,आता मे अखेरपर्यंत आपणास ही …

Read More »

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याचा मृत्यू , जबाबदार कोण? मंत्री कार्यालय कि गुच्छ अधिकाऱ्यांमधल्या नेत्याप्रती निष्ठा आणि स्पर्धेचा पहिला बळी

मुंबई: विशेष प्रतिनिधी एकाबाजूला राज्यातील जनता कोरोना आजारावर विजय मिळण्यासाठी राज्य सरकारला साथ देत आहे. तर दुसऱ्याबाजूला मर्जीतील व्यक्तींची खास पदावर नियुक्ती करण्याच्या आणि नियुक्तीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब करण्याच्या पध्दतीमुळे एका अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची दुख:द घटना पुणे येथे घडली. त्यामुळे मंत्रालय आणि इतर शासकिय अधिकाऱ्याकडून याबाबत हळहळ …

Read More »

२४ तासात १२३३ रूग्ण…. चार दिवसात दुसऱ्यांदा विक्रमी संख्या ३४ जणांचा मृत्यू मुंबईतील २५ जणांचा समावेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीतांच्या संख्येने विक्रमी आकडे पार करण्याची नवी पंरपरा सुरु केल्याचे दिसून येत आहे. गेल्या शनिवारी २ मे रोजी एकाच दिवसात १ हजार रूग्ण आढळून आल्यानंतर चार दिवसात २४ तासात राज्यात १२३३ रूग्णांचे कोरोना निदान झाले. त्यामुळे राज्यातील रूग्ण संख्या १६ हजार ७५८ वर पोहोचली असून ३४ जणांचा …

Read More »

सोलापूरात ८ ने वाढ होत १५० चा टप्पा ओलांडला मृतकांची संख्या १० वर पोहोचली

सोलापूर: प्रतिनिधी शहरातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आज या संख्येत ८ ने वाढ झाली आहे. तर आज एकाचा मृत्यू झाल्याने ही संख्या आता १० वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत कोरोनाबाधीतांची संख्या १५३ वर पोहोचली आहे. दिवसभरात २ हजार ६३३ जणांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी २ हजार २१६ …

Read More »

लॉकडाऊनमुळे राज्यातील २ कोटी २९ लाख कामगारांवर बेकारी? चार कोटी ५० लाख कामगारांपैकी फक्त २० लाख ४० हजारांचे नोकऱ्या शाबूत

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला जवळपास ४५ दिवस पूर्ण होत आहेत. याकाळात दैनंदिन जीवनात काम करणाऱ्या असंघटीत ४ कोटी ५९ लाख ५० हजार कामगार काम करत होते. मात्र यातील जवळपास ५० टक्के कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता …

Read More »