Breaking News

सोलापूरात ८ ने वाढ होत १५० चा टप्पा ओलांडला मृतकांची संख्या १० वर पोहोचली

सोलापूर: प्रतिनिधी
शहरातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आज या संख्येत ८ ने वाढ झाली आहे. तर आज एकाचा मृत्यू झाल्याने ही संख्या आता १० वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत कोरोनाबाधीतांची संख्या १५३ वर पोहोचली आहे.
दिवसभरात २ हजार ६३३ जणांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी २ हजार २१६ जणांचे अहवाल नकारात्मक आले. २६४ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर ८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
निदान झालेल्या ८ रूग्णांपैकी १ चा मृत्यू झाला आहे. या रूग्णाची चाचणी केल्यावर तो कोरोनाबाधीत असल्याचे आढळून आले. निदान झालेले रूग्ण हे सदर बझार लष्कर, साईबाबा चौक, एकता नगर ,मोदी, राहुल गांधी झोपडपट्टी, सिध्देश्वर पेठ आदी भागातील आहेत. यापैकी सदर बझार आणि मोदी येथे प्रत्येकी २ रूग्ण असून इतर ठिकाणी प्रत्येकी १ रूग्ण आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *