Breaking News

कालचा विक्रम मोडत आज १३६२ रूग्णांची वाढ राज्याची संख्या १८ हजारावर पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनोग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याच्या संख्येत आजही खंड पडलेला नाही. काल १२३३ रूग्ण आढळून आले होते. त्यात आज १४० ने वाढ होत ही संख्या १३६२ वर पोहोचली असून राज्यातील रूग्णांची संख्याही १८ हजार पार पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सामाजिक माध्यमातून संवाद साधताना दिली.
राज्यात आढळून आलेल्या रूग्णापैकी ७३ टक्के रूग्णांमध्ये लक्षणेच दिसून येत नाहीत. तर ३ ते ५ टक्के लोकांना क्रिटीकल परिस्थितीत रूग्णालयात आणण्यात येत असून अशा रूग्णांचा त्यामुळे मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पाहून कंटनेमेंट झोन तयार करण्यात येत आहेत. मात्र राज्यातील नागरिकांना या विषयाचे गांभीर्य घेतले जात नाही. त्यामुळे अनेक झोन मध्ये नागरिक मोकळ्या पध्दतीने फिरत आहेत. यामुळे या त्यांच्यात कोरोनाचा प्रसार होत असल्याचे त्यांनी सांगितले.
संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल असे अनेकांनी सांगितले होते. मात्र त्या प्रमाणात तशा पध्दतीने आपल्याकडे रूग्णांची संख्या वाढत नाही. मात्र आपण चाचणीची संख्या वाढवित असल्याने कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय धारावीतील लोकोंना संस्थात्मक विलगीकरणात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. तेथील नागरिक कमी जागेत जास्त रहात असल्याने तेथे रूग्णांची संख्या वाढत आहे. मात्र आता तेथील नागरिकांना धारावीच्या बाहेर ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय कोरोनाची एकच टेस्ट, तसेच १४ दिवसाचा कालावधी कमी करणे आदी गोष्टींबाबत केंद्राशी चर्चा झाली आहे. या अनुषंगाने केंद्र सरकार अभ्यास करून त्याबाबतचे मार्गदर्शन आपल्याला करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मृत्यू –
आज राज्यात ४३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २४, पुण्यातील ७ , वसई विरार मध्ये ५, सोलापूर शहरात २, अकोला शहरात १, पालघरमध्ये १ आणि औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे. याशिवाय मणिपूरमधील १ आणि बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.
मृत्यूंबद्दल अधिकची माहिती –
आज झालेल्या मृत्यूंपैकी २४ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ४३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २५ रुग्ण आहेत तर १४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ४३ रुग्णांपैकी २९ जणांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६९४ झाली आहे.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       ११३९४ ४३७*
ठाणे           ९३
ठाणे मनपा ६५०
नवी मुंबई मनपा ६५९
कल्याण डोंबवली मनपा २६३
उल्हासनगर मनपा १४
भिवंडी निजामपूर मनपा २१
मीरा भाईंदर मनपा १८९
पालघर ४६
१० वसई विरार मनपा १८७
११ रायगड ७६
१२ पनवेल मनपा १२५
  ठाणे मंडळ एकूण १३७१७ ४७२
१३ नाशिक ४७
१४ नाशिक मनपा ५४
१५ मालेगाव मनपा ४३२ १२
१६ अहमदनगर ४४
१७ अहमदनगर मनपा
१८ धुळे
१९ धुळे मनपा २४
२० जळगाव ६४ ११
२१ जळगाव मनपा १४
२२ नंदूरबार १९
  नाशिक मंडळ एकूण ७१५ ३१
२३ पुणे १०५
२४ पुणे मनपा १८९९ १२२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२५
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा १७७ १०
२८ सातारा ९४
  पुणे मंडळ एकूण २४०६ १४१
२९ कोल्हापूर १०
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली ३२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग
३४ रत्नागिरी १६
  कोल्हापूर मंडळ एकूण ७१
३५ औरंगाबाद
३६ औरंगाबाद मनपा ३९७ १२
३७ जालना
३८ हिंगोली ५८
३९ परभणी
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण ४६८ १३
४१ लातूर २५
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा २९
  लातूर मंडळ एकूण ६१
४७ अकोला
४८ अकोला मनपा ९०
४९ अमरावती
५० अमरावती मनपा ६९
५१ यवतमाळ ९३
५२ बुलढाणा २४
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण २९० २१
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा २०४
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
  नागपूर एकूण २१२
  इतर राज्ये ३४
  एकूण १७९७४ ६९४

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *