Breaking News

२४ तासात १२३३ रूग्ण…. चार दिवसात दुसऱ्यांदा विक्रमी संख्या ३४ जणांचा मृत्यू मुंबईतील २५ जणांचा समावेश

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाबाधीतांच्या संख्येने विक्रमी आकडे पार करण्याची नवी पंरपरा सुरु केल्याचे दिसून येत आहे. गेल्या शनिवारी २ मे रोजी एकाच दिवसात १ हजार रूग्ण आढळून आल्यानंतर चार दिवसात २४ तासात राज्यात १२३३ रूग्णांचे कोरोना निदान झाले. त्यामुळे राज्यातील रूग्ण संख्या १६ हजार ७५८ वर पोहोचली असून ३४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबईतली रूग्णांच्या संख्येने १० हजाराचा टप्पा पार करत १० हजार ७१४ वर पोहोचली आहे. तर मुंबई आणि ठाणे मंडळाची संख्या १२ हजार ७१६ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ३ हजार ९४ जण घरी गेले असून आज दिवसभरात २७५ रूग्ण बरे होवून घरी गेल्याचे त्यांनी सांगितले.
मृत्यू –
आज राज्यात ३४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २५, पुण्यातील ३ , अकोला शहरात ३, जळगाव शहरात १ तर सोलापूर शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे.
मृत्यूंबद्दल अधिकची माहिती –
आज झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १८ रुग्ण आहेत तर १३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. ३४ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये ( ७९ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६५१ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या –
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,९०,८७९ नमुन्यांपैकी १,७३,८३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १६,७५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १०४८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ११,६९२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५१.१४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे –  सध्या राज्यात २,११,११२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३,१०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका १०७१४ ४१२
ठाणे ८६
ठाणे मनपा ५४३
नवी मुंबई मनपा ५१९
कल्याण डोंबवली मनपा २४७
उल्हासनगर मनपा १३
भिवंडी निजामपूर मनपा २१
मीरा भाईंदर मनपा १८७
पालघर ३६
१० वसई विरार मनपा १७५
११ रायगड ६०
१२ पनवेल मनपा ११५
ठाणे मंडळ एकूण १२७१६ ४४१
१३ नाशिक २४
१४ नाशिक मनपा ४८
१५ मालेगाव मनपा ३९१ १२
१६ अहमदनगर ४४
१७ अहमदनगर मनपा
१८ धुळे
१९ धुळे मनपा २४
२० जळगाव ५१ ११
२१ जळगाव मनपा १४
२२ नंदूरबार १९
नाशिक मंडळ एकूण ६३२ ३१
२३ पुणे १०३
२४ पुणे मनपा १८६१ ११५
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२३
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा १६९
२८ सातारा ८९
पुणे मंडळ एकूण २३५१ १३२
२९ कोल्हापूर १०
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली ३२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग
३४ रत्नागिरी १६
कोल्हापूर मंडळ एकूण ७१
३५ औरंगाबाद
३६ औरंगाबाद मनपा ३७० ११
३७ जालना
३८ हिंगोली ५८
३९ परभणी
४० परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण ४४१ १२
४१ लातूर १९
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा २८
लातूर मंडळ एकूण ५४
४७ अकोला
४८ अकोला मनपा ७५
४९ अमरावती
५० अमरावती मनपा ६९
५१ यवतमाळ ९२
५२ बुलढाणा २४
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण २७३ २०
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा १८०
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
नागपूर एकूण १८८
इतर राज्ये ३२
एकूण १६७५८ ६५१

 

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *