Breaking News

Tag Archives: budget session

…तर भाजपा अधिवेशन चालू देणार नाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

मुंबई बॉम्बस्फोटात शेकडोंचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यासाठी मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपावरून अटक झालेले मंत्री नवाब मलिक यांना महाविकास आघाडीने पाठिंबा देणे म्हणजे दाऊद इब्राहिमला साथ देणे आहे. देशद्रोही गुन्ह्यात अटक झालेल्या नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा उद्या बुधवार २ मार्चपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी अपेक्षा आहे. …

Read More »

राज्याच्या तिजोरीत किती जमा आणि खर्च येणार तर तूट किती? वाचा केंद्राकडून ७० हजार कोटी न दिल्यास तूट वाढू शकते अशी भीती

मुंबईः प्रतिनिधी मागील वर्षात कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच वित्तीय केंद्रे बंद राहिली. त्यामुळे राज्याच्या महसूलात १ लाख कोटी रूपयांची तूट आली. तरीही यंदाच्या वर्षी ३ लाख ६८ हजार ९८७ कोटी रूपये अंदाजीत महसूली जमेचे उद्दिष्ट असलेला आणि १० हजार २२५ कोटी तर राजकोषीय ६६ हजार ६४१ कोटी रूपयांच्या तूटीचा  आणि …

Read More »

अजित पवारांच्या मनात आजही फडणवीसच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली माफी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर त्यावरील चर्चा सुरु करण्यासंदर्भात आज दुपारी विधानसभेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होती. त्यावेळी अजित पवार यांनी अनावधाने फडणवीस यांचा उल्लेख विरोधी पक्षनेते असा करण्याऐवजी मुख्यमंत्री असा केला. मात्र लगेच आपली चूक …

Read More »

आमदारांच्या गाडीवरील ड्रायव्हरच्या वेतनसाठीही विधेयक आणणार सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीवर अजित पवारांचे आश्वासन

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सर्व आमदारांच्या वाहनावर काम करणाऱ्या खाजगी ड्रायव्हर अर्थात वाहन चालकांकडून आमदारांची काळजी घेतली जाते. मात्र या वाहन चालकांना फारच तुटपुंजी रक्कम वेतनाच्या स्वरूपात मिळते. त्यामुळे आमदारांच्या वाहनावर काम करणाऱ्या वाहन चालकांच्या वेतनात वाढ करावी अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर सुधीर …

Read More »

मंत्री आणि विरोधी पक्षनेते तुम्ही दुसरा अध्यक्ष नेमलाय का? विधासभा अध्यक्ष नाना पटोलेंची भर सभागृहातच विचारणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना पुन्हा अनुदान देण्याच्या प्रश्नावरील चर्चेच्यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रश्नोत्तरे सुरु झाली. त्यामुळे अखेर सभागृहात अध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांन तुम्ही दोघांनीच दुसरा अध्यक्ष नेमलाय का? अशी मिश्किल विचारणा करत …

Read More »

आमदारांच्या प्रश्नांना उत्तरे नाही, मग मुख्य सचिवांना माफीची शिक्षा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मध्यस्थीनंतर एकवेळ संधी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे कायदेमंडळ असलेल्या विधानसभा सदस्यांकडून मतदारसंघातील अनेक प्रश्न औचित्याच्या मुद्याद्वारे उपस्थित करण्यात येतात. मात्र संबधित विभागाकडून महिना उलटून गेला तरी त्यावर उत्तर दिले जात नसल्याने राज्याच्या मुख्य सचिवांनी विधानसभेच्या दरवाज्यात उभे राहून सभागृहाची माफी मागावी असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

मुस्लिम आरक्षणामुळे मराठा, ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मुस्लिम समुदायाला पुन्हा आरक्षण देण्याचा निर्णय अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर करताच भाजपा नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आरक्षणामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणावर परिणाम होईल असा इशारा दिला. विधान परिषदेत मलिक यांनी घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. …

Read More »

फडणवीसांनी रद्द केलेले मुस्लिम आरक्षण महाविकास आघाडी देणार विधान परिषदेत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची घोषणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने रद्दबातल ठरविलेले मुस्लिम समाजाचे आरक्षण विद्यमान महाविकास आघाडी पुन्हा बहाल करणार आहे. पूर्वीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला सच्चर समितीच्या शिफारसीनुसार ५ टक्के आरक्षण दिले होते. मात्र त्यास भाजपा सरकारने ब्रेक लावला. परंतु विद्यमान महाविकास आघाडीकडून मुस्लिम समाजाला …

Read More »

सावरकर गौरव प्रस्तावावरून विरोधकांचा गोंधळ कामकाज तहकूब झाल्यानंतर विधानसभेत विरोधकांकडून प्रतिविधानसभा

मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभेत आज  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिनी सावरकर यांच्या गौरवपर प्रस्ताव सभागृहाने संमत करावा या मागणीसाठी विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या प्रस्तावास ज्येष्ठ भाजप चंद्रकांत पाटील यांनी समर्थन दिले. अध्यक्ष नाना पटोले यांनी अनुमती नाकारताच मी सावरकर अशा भगव्या टोप्या घातलेले  …

Read More »

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला धरले धारेवर शेतकरी कर्जमाफी, महिला अत्याचार मुद्यावरून गोंधळ

मुंबईः विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या कामकाजास सुरूवात होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा मुद्दा व महिला अत्याचारांच्या वाढत असलेल्या घटनांप्रश्नी मुद्दे उपस्थित करण्यास सुरुवात केली. तसेच हेक्टरी २५ हजार रूपये मदतीची मागणी करत या स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी विधानसभेत केली. मात्र विधानसभा अध्यक्ष …

Read More »