Breaking News

Tag Archives: budget session 2023 at mumbai

आदित्य ठाकरे उभे राहताच मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ऐ खाली बस, काय कळत तुला… अजित पवारांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना शिंदेचा टोला

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेकडो टन कांदा बाजारात विकूनही २ रूपये मिळल्याचे आणि १ रूपया जास्तीचा भरावा लागल्याची घटना उघडकीस आली. तसेच कांद्याला भाव नसल्याने अनेक शेतकरी आपला कांदा रस्त्यावर टाकून देत आहेत. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून विधानभवनात आणि दोन्ही सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न आक्रमक पध्दतीने मांडत आहेत. अजित पवार यांनी विधानसभेत कांदासह …

Read More »

कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर अजित पवारांच्या मागणीवर मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन

राज्यातला कांदा, कापूस, सोयाबीन, हरभरा, द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यांचा माल कवडीमोल दराने विकला जात आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तातडीने सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. कांदा उत्पादक शेतकऱ्याला तर दोन रुपये चेक दिल्याची बाब आम्ही सरकारच्या …

Read More »

कांदा, द्राक्षे, हरभरा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ठाकरे गटाने कामकाज बंद पाडले शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नानी देणे घेणे नसल्याने प्रस्ताव चर्चेला येऊ दिला नसल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप

मागील काही दिवसांपासून कांदासह द्राक्षे, कापूस, हरभरा शेतकरी उत्पादनाच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण होत आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला ८०० किलो कांदा विकून अवघ्या २ रूपयांचा चेक मिळाला तर दुसऱ्या एका शेतकऱ्याला खर्च वजा जाता एक रूपया जास्तीचा मोजावा लागला. यावरून कांदा उप्तादक, द्राक्षे, कापूस, हरभरा शेतकऱ्यांचे होणारे हे …

Read More »

सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरी द्रोही सरकारचा निषेध असो गळ्यात कांद्याच्या आणि कापसाच्या माळा घालत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक... जोरदार घोषणाबाजी...

सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरी द्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे… हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे… दोन रुपयाचा चेक देणार्‍या सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची चेष्टा करणार्‍या सरकारचा निषेध असो… गद्दार सरकार जोमात, शेतकरी मात्र कोमात… कांदा, कापसाने रडवलं सरकारने कमावलं, वा …

Read More »

आणि मिलिंद नार्वेकरांच्या विधानभवनातील उपस्थितीवरून आदित्य ठाकरेंनीच उपस्थित केला सवाल प्रश्न उपस्थित करताच मिलिंद नार्वेकर पडले बाहेर

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून मिलिंद नार्वेकर यांना उभा महाराष्ट्र ओळखतो. मात्र राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर मिलिंद नार्वेकर हे सातत्याने अधिवेशन काळात विधानसभेतील किंवा विधान परिषदेतील आमदारांसाठी असलेल्या लॉबीत जाऊन शिंदे गटाच्या मंत्र्यांना भेटत असल्याची चर्चा सुरु होती. मात्र अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यपालांच्या …

Read More »

अजित पवारांनी साधला अप्रत्यक्ष विधानसभाध्यक्षांवर निशाणा, नियमांना बगल देण्याचे प्रकार वाढले… शिंदे-फडणवीस सरकारबरोबरच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप

विधिमंडळ सभागृहांचे कामकाज भारतीय संविधान, नियम, प्रथा आणि परंपरेनुसार चालते. अलीकडच्या काळात बऱ्याच प्रथा, परंपरा आणि नियमांना आपण बगल देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘पॉईंट ऑफ प्रोसिजर’व्दारे सभागृहात केला. विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे बऱ्याचवेळा सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना जाणीवपूर्वक झुकते माफ देण्यात येत …

Read More »