Breaking News

Tag Archives: budget session 2023 at mumbai

नाना पटोलेंचा आरोप, शिंदे-फडणवीस सरकारचे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तातडीने मदत जाहीर करा

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. कांदा, कापूस, धान, सोयाबीन, हरभरा, तुरीसह शेतमालाला भाव नाही त्यातच अवकाळीने झोडपल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची राखरांगोळी झाली आहे, त्यामुळे सर्व कामकाज बंद करून शेतकऱ्यांबद्दल सरकराची भूमिका काय आहे हे कळले पाहिजे, संकटातील शेतकऱ्यांला सरकारने तातडीने मदत …

Read More »

देवस्थान जमिनप्रकरणी जयंत पाटील यांच्या प्रश्नावर फडणवीसांचे चार महिन्यात तपासाचे आश्वासन सरकार बदलताच तक्रारदाराचे संरक्षण काढत त्याच्या विरोधातच गुन्हे दाखल

विधानसभेचे कामकाज सुरु होताच हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार आपण कोणीही खपवून घेऊ शकत नाही. या प्रकरणात तक्रारदाराचे सरंक्षण केले पाहिजे होते. मात्र उलट सरकार बदलल्यानंतर तक्रारदाराचे संरक्षण काढण्यात आले, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ही बाब अयोग्य आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र …

Read More »

उपकार प्राप्त इमारतींचा वाढीव सेवाशुल्क कर रद्दः २० हजार कुटुंबियांना होणार लाभ २५० रुपयेच घेणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

मुंबईतील म्हाडाच्या उपकार प्राप्त इमारतींना महिन्याला आकारण्यात येणारे वाढीव सेवाशुल्क रुपये ६६५.५० रद्द करुन जुन्या दराने २५०/- रुपयेच आकारण्यात येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी विचारेल्या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. तसेच या इमारती धोकादायक झाल्या …

Read More »

मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी… नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली. या नैसर्गिक संकटामुळे हजारो हेक्टरवरील उभी पिके वाया गेल्याने हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहिर करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उध्दव ठाकरे गटाच्या आमदारांनी …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय, सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली घोषणा

शासन सेवेत सरळसेवेने भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंतच्या जाहिरांतीकरिता दोन वर्षाची शिथीलता देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज सांभाळणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत व मंत्री उदय सामंत यांनी …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, मुंबईतील एआयसीटीईचे कार्यालय दिल्लीला हलवू नका भुजबळांची सभागृहात मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांचे मुंबईतील पश्चिम विभागीय कार्यालय दिल्लीत स्थलांतरित करण्यात येत आहे. याबाबत सूचना पत्र देण्यात आले आहे. या कार्यालयाच्या स्थलांतरामुळे शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे एआयसीटीईचे कार्यालय स्थलांतर करण्यात येऊ नये तो निर्णय थांबवावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार तथा राज्याचे …

Read More »

बाळासाहेब थोरात यांची मागणी, अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात तात्काळ वाढ करा मातंग समाजाच्या तरुणांच्या कल्याणासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा

अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशासेविका यांनी दुर्गम ग्रामीण भागात अत्यंत चांगले काम करत आहेत. कोरोना काळात त्यांनी आरोग्य सेवा सांभाळण्याचे काम केले. पण त्यांना कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. सरकारने तात्काळ त्यांच्या मानधनात वाढ केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडताना …

Read More »

अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा, रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला’ भंगार एसटीवर जाहिरातप्रकरणी निलंबित केलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची केली मागणी

एसटीच्या मोडक्या, तुटक्या व भंगार बसवर राज्यशासनाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई म्हणजे ‘रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला…’ असा प्रकार असल्याचा उपरोधिक टोला शिंदे-फडणवीस सरकारला लगावत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. दरम्यान राज्य शासनाने जाहिरातींवर पैसे उधळण्यापेक्षा …

Read More »

अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नी मंत्री लोढांच्या उत्तराने समाधान झाले नसल्याने विरोधकांचा सभात्याग २० टक्के मानधन वाढीसोबत नवीन भरतीचा निर्णय लवकरच : लोढा

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात ५ बैठका मंत्रालयात तर ४ बैठका मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्यासोबत बैठक झाल्या. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांवर राज्य सरकार सकारात्मक आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात आजवरची सर्वात मोठी वीस टक्के इतकी वाढ केली जाईल. तसेच २०,१८३ इतकी रिक्तपदे या मे महिन्यांपर्यंत भरली जातील अशी माहिती महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात …

Read More »

उध्दव ठाकरे यांच्या त्या विधानावर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार, ‘बेगानी शादी में अब्दुला..’ चा पलटवार पोट निव़डणूक निकालानंतर उध्दव ठाकरेंनी टीका करत आता कसबा बाहेर आलाय देशही बाहेर येईल टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

तुम्ही पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूकीत प्रचाराच्या निमित्ताने आम्हाला म्हणालात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारासाठी राज्याच्या इतिहासात रोड शो करण्याची घटना. पण तुम्हीही गल्लीबोळात फिरत होतात. तुमचे नेते शरद पवार हे ही छोट्या छोट्या मिटींगा घेत होते. ते ही गल्लीबोळातच फिरत होते ना असा खोचक टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार …

Read More »