Breaking News

दिवाळीला अव्वाच्यासव्वा भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स विरोधात ‘या’ ई-मेलवर करा तक्रार ट्रॅव्हल कंपन्या जास्त भाडे आकारतात; घाबरू नका 'या' मेलवर करा तक्रार

दिवाळीला खासगी बससेवा पुरवणारे आपल्या मर्जीने भाडे आकारून प्रवाशांची लूट करत असतात. अवास्तव भाडं आकारत असतात. त्यामुळे आता जर खासगी बससेवा पुरवणाऱ्यांकडून जास्त भाडं आकारलं गेलं तर त्यांच्याविरोधात तक्रार करता येणार आहे.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहतूकदारांनी प्रवाशाकडून निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणी केल्यास प्रवाशांनी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या [email protected] या ईमेल पत्त्यावर तक्रारी किंवा पुरावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

खाजगी प्रवासी बस सेवा पुरविणारे वाहतूकदारांनी संबंधित मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने वाहतूक सेवेकरीता आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या कमाल दीडपटपर्यंत भाडे आकारता येईल. त्यापेक्षा अधिक भाडे आकारणी करणाऱ्या खासगी बसेसवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश मोटार वाहन निरीक्षक यांना देण्यात आलेले आहेत.

तसेच अधिक भाडे आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा आढळून आल्यास अशा वाहतूक पुरवठादारांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत खटला दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली आहे.

खासगी बस वाहतूक, ट्रॅव्हल्सकडून सणाच्या काळात अवास्तव बस प्रवास भाडे आकारून होणारी आर्थिक लूट त्वरित थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात होती. प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना बेकायदा भाडे आकारणी विरोधात कारवाई करावी,अशा मागणीचे निवेदन देण्यात आलं

Check Also

अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. भारत निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *