Breaking News

शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडूंना दोन महिन्याचा सश्रम कारावास, परंतु लगेच जामीन चांदूरबाजार प्रथम न्यायालयाचा निकाल

मराठी ई-बातम्या टीम

२०१४ च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंबईतील मालमत्तेची माहिती लपविल्याप्रकरणी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना चांदूराबाजार प्रथम न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा दिली. परंतु त्यानंतर त्यांनी लगेच जामीनासाठी अर्ज केल्यानंतर लगेच त्यांना जामीनही मंजूर झाला. कडू यांच्या विरोधात भाजपाचे नगरसेवक गोपाळ तिरमारे यांनी तक्रार दाखल केली होती.

न्यायालयाने दिलेल्या निकालावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की,  चुकीच्या निर्णयाचे स्वागत करतो असे म्हणत २०१४ विधानसभा निवडणुकीसाठी २०१४ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या या घरावर आम्ही कर्ज घेतले होते. त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता. हा काही गंभीर प्रकार नव्हता. मात्र या प्रकरणात न्यायालयाने आज जो काही चुकीचा निर्णय दिल्याचे म्हणाले.

२०१४ च्या आधी राज्य सरकारने आमदारांची एक सोसायटी गठीत केली होती. त्यावेळी राज्य सरकारने सर्व आमदारांना कर्जाची हमी घेत घरे दिली होती. त्याच घरावर कर्ज काढले होते. त्या घऱाच्या कर्जाची रक्कम उमेदवारी अर्जावर टाकली गेली, मात्र घर आणि घराचा क्रमांक देण्यास विसरलो होतो. हे काही जाणुनबुजून केलं नव्हते. कर्जाचं घर दाखविल्याचे त्यांनी सांगितले.

हा संपूर्ण प्रकार अचलपूरला घडला आणि या प्रकरणाची तक्रार चांदूर बाजार येथील व्यक्तीने आसेगाव येथील पोलीस ठाण्यात दिली होती. ज्या पोलीस अधिकाऱ्याने एका गरीब माणसाला २० हजार घेऊन लुबाडले होते, त्याला आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवला होता. म्हणून त्याने हा डाव केला. आसेगावला त्याने तक्रार घेतली, दुसरा एक विरोधक उभा करत केस केली. जामीन मिळाला असून आता वरच्या न्यायालयात आम्ही जाणार आहोत. वरच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली. या खटल्यात चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने निकाल दिला.

Check Also

चोकलिंगम यांची माहिती, पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज, १५० कंपनी तैनात

महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *