Breaking News

चला धावू या नवी मुंबईत नेत्रदान, अवयव दानाच्या जनजागृतीसाठी तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने साडेपाच कि.मी आणि अडीच कि.मी अंतराची मँरेथॉन होणार

मुंबई : प्रतिनिधी

नेत्रदान आणि अवयवासंदर्भात जनजागृती वाढावी यासाठी तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाकडून नवी मुंबईत मँरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ४ मार्च २०१८ रोजी होणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

ही स्पर्धा तेरणा वैद्यकीय महाविद्यालयच्या आयआरआयएस-२०१८ अंतर्गत, आकांक्षा प्रस्तुत  आणि माध्यम प्रायोजक मराठी e-बातम्या यांच्या संयुक्त विद्यमाने  ही स्पर्धा होत आहे. त्याचबरोबर आरओ शिपिंग कार्पोरेशन प्रा.लि., साई किरण क्लिनिंग, शालया, सामरीन ग्रुप आदी कंपन्यांनीही सहकार्य केले आहे.

ही मँरेथॉन स्पर्धा दोन विभागात होणार असून यातील एक ५.५ किलोमीटर अंतराची आणि दुसरी २.३ किलोमीटर अंतराची होणार आहे. समाजात नेत्रदान आणि अवयवदाना संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणालाही फक्त ९९ रूपयांचे शुल्क भरून सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तेजस वटकर (मो. ९९६७४७४९६८), जय गोयल (मो.७७१८०३१४५०), धवल रांका (मो.९९६९९६५५३), तनिक्ष ओबेरॉय (मो.७९७७५४५९११) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मँरेथॉन स्पर्धेच्या आयोजकांनी केले.

Check Also

चोकलिंगम यांची माहिती, पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज, १५० कंपनी तैनात

महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *