Breaking News

समस्त सोलापूरकरांच्या सहभागाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सवाची सांगता मिरवणूकीत ७ ते ८ लाख आंबेडकरी अनुयांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गेले आठवडाभर सुरु असलेल्या जंयती उत्सवाची सांगता काल रविवारी झाली. जंयतीनिमित्त रविवारी काढण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती मध्यवर्ती समितीच्या मिरवणूकीत तब्बल १०० हून अधिक मंडळांनी सहभाग घेतला. सकाळी मोठ्या जल्लोषात सुरु झालेली मिरवणूक रात्री १२ वाजता संपली. या मिरवणूकीत तब्बल ७ ते ८ लाख आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते.

या जंयती उत्सवाच्या मिरवणूकीत सोलापूर शहरातील जवळपास १०० हून अधिक जंयती मंडळानी सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या प्रत्येक मंडळाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा, त्यासमोर आकर्षक रोषणाई आणि डॉ. आंबेडकरांच्या जीवनाशी संबधित लढ्यातील कलाकृतींची सजावट करण्यात आलेली होती. तसेच प्रत्येक मंडळाकडून कार्यकर्त्यांना जंयती उत्सवाची जल्लोषात सांगता करण्यासाठी डि.जेची व्यवस्था करण्यात आली होती.

या मिरवणूकीत नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या प्रबुध्द भारत मंडळाकडून ३० फुट उंचीची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची मुर्ती स्थानापन्न अवस्थेतीतील सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. तसेच याच मंडळाकडून डॉ.आंबेडकरांनी वास्तव्य केलेले लंडनस्थित घराची प्रतिकृती मिरवणूकीत उभारण्यात आली होती. याशिवाय ब्राम्हण्यवादाच्या विरोधात लढणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज आणि दलित साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचे शिल्पही मिरवणूकीत उभारण्यात आले होते. त्याचबरोबर भीमा कोरेगांवच्या विजयी स्तंभाची प्रतिकृतीही उभारण्यात आली होती.

तर जी.एम. ग्रुपकडून तथागत गौतम बुध्दानी दिलेल्या पहिल्या पाच भिक्षुकांना दिक्षा देतानाची प्रतिकृती मिरवणूकीत उभारण्यात आली. त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पत्नी माता रमाई, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांचे सजीव देखावेही उभारण्यात आले.

याशिवाय काही मंडळांनी तथागत गौतम बुध्द यांच्या निद्रीस्त अवस्थेतील शिल्प ही उभारण्यात आले होते. याशिवाय अनेक मंडळांनी स्त्री भृण हत्या, झाडे लावा-झाडे जगवा यासह पाणी वाचविण्याचे सामाजिक संदेशही फलकांच्या माध्यमातून देत होते.

या मिरवणूकीचा आनंद लुटण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अनेक गाव-तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर वाहने भरून आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते. सोलापूरच्या शेजारी असलेल्या कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी अनुयायी आले होते.

यातील काही  निवडक क्षणचित्रे:-

Check Also

अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. भारत निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *