Breaking News

ज्येष्ठ रंगकर्मींच्या मार्गदर्शनाने ‘बालरंगभूमी अभियान’ चळवळीची सुरुवात बालनाट्याच्या प्रयोगांना महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न करणार

मुंबई : प्रतिनिधी

बालरंगभूमीचा विकास घडवून नाट्यरसिकांना बालनाट्याचा आनंद देतानाच बालवयातच कलाकार-तंत्रज्ञांची पिढी घडविण्याच्या उद्देशाने आज मुंबईमध्ये ‘बालरंगभूमी अभियान’ संघटनेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी वर्षाताई विनोद तावडे तसेच ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे, बालरंगभूमी अभियानाच्या अध्यक्षा कांचनताई सोनटक्के आणि नाट्यक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून या बालरंगभूमी अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. यात बालरंगभूमी विषयक विविध उपक्रमांची संख्या, व्याप्ती व दर्जा उंचावून बालरंगभूमी सकस व समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे. शालेय शिक्षकांना नाट्यप्रशिक्षण देणे. बालनाट्य किशोरनाट्य कुणारनाट्य सादरीकरणासाठी येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासन, महानगरपालिका, जिल्हा समिती स्तरावर प्रयत्न करणे. बालनाट्याच्या प्रयोगांना महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न करणे. शासनाच्या सह्याद्री आणि इतर खाजगी वाहिन्यांवर बालनाट्यासाठी वेळ राखून ठेवण्यासाठी तसेच रंगभूमीच्या इतर पुरस्कारांबरोबर बालनाट्याला पुरस्कार देण्यासाठी व मिळविण्यासाठी प्रयत्न करणे. बालदिनानिमित्त नाट्य परिषदेच्या प्रत्येक शाखेच्या ठिकाणी प्रतिवर्षी एक बालनाट्य महोत्सव आयोजित करण्यासाठी पाठपुरावा करणे. बालनाट्याचे प्रयोग, बालनाट्य महोत्सव आणि बालरंगभूमी संदर्भात विविध विषयांवर उपक्रम चर्चासत्रे इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे. दर्जेदार बालनाट्य संहिता संग्रहित करणे. बालनाट्य मार्गदर्शनपर पुस्तिका छापून शासनाच्या मदतीने त्या शालेय शिक्षकांपर्यंत पोहचविणे ही बालरंगभूमी अभियानाची उद्दिष्टे आहेत.

डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत अहमदनगर, शिरूर, सोलापूर, बार्शी आदी ठिकाणी बालनाट्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. याला उत्तम प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील बालरंगभूमी चळवळीचा आढावा घेतला असता बालरंगभूमी अधिक भक्कम आणि परिपूर्ण होण्यासाठी बालरंगभूमी संघटनेची  निवड आम्हाला प्रकर्षाने जाणवली. यासाठी महाराष्ट्रातील या क्षेत्रात कार्यरत असलेल्या २५ रंगकर्मींना एकत्र घेऊन अनुभवी ज्येष्ठ रंगकर्मींचा सल्ल्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनात ‘बालरंगभूमी अभियान’ या संघटनेची दि. ५ जुलै २०१७ रोजी स्थापना केली आणि याची धर्मादाय आयुक्त कार्यालयात रीतसर नोंदणी केल्याचे कांचनताई सोनटक्के म्हणाल्या.

 

Check Also

चोकलिंगम यांची माहिती, पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज, १५० कंपनी तैनात

महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *