Breaking News

५१ दिवसानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर राज्य सरकारची माघार, मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील सरसकट ८६१ विद्यार्थ्यांच्या फेलोशिपची मागणी अखेर मान्य

राज्यातील ८६१ संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसाठी मागील ५१ दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करीत असलेल्या फेलोशिप संशोधक विद्यार्थी आंदोलन समितीच्या आंदोलनाला अखेर आज यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सामाजिक न्याय सचिव तसेच विद्यार्थ्यांच्या झालेल्या बैठकीत या सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असून विद्यार्थ्यांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या विविध सामाजिक व राजकीय पक्ष कृती समितीने या निर्णयावर आनंद व्यक्त केला. विविध पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही या आंदोलनात लक्ष घातल्यामुळे राज्य सरकारने हा विषय गांभीर्याने घेत आज बैठक घेऊन हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षणासाठी सन १९१३ साली न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठाचा प्रवास केला होता या ऐतिहासिक प्रवासाला २०१३ मध्ये १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ बार्टीने युजीसी आणि परदेशात पीएचडी व एमफिल करणाऱ्या ५ विद्यार्थ्यांसाठी हि योजना सुरु केली होती. २०२१ मध्ये या विद्यर्थ्यांच्या संख्येत वाढ होऊन हि संख्या २०० इतकी वाढविण्यात आली व पीएचडी ऐवजी एमफिलसाठी पाच वर्षासाठी हे स्वरूप निश्चित करण्यात आले होते यात एम करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति महिना ३५ हजार रुपये तसेच प्रवास भत्ता असे प्रति महिना एकूण ४० हजार रुपये पाच वर्षांसाठी देण्यात येतात. सन २०२१ मध्ये सामाजिक न्याय विभागाने २०० विद्यार्थ्यांना विविध विषयांवर फेलोशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज मागविले होते. यावेळी राज्यातून यावेळी १०३५ अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी मुलाखतीच्या माध्यमातून ८६२ विद्यार्थ्यांपैकी २०० विदयार्थ्यांच्या निवडीस बार्टीने मान्यता दिली होती.

मात्र बार्टीने सरसकट ८६२ विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी या मागणीसाठी या विद्यार्थ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर मागील ५१ दिवसांपासून धरणे आंदोलनाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात भीम आर्मी भारतीय लोकसत्ताक संघटना, इसरा , यांच्यासह आनंदराज आंबेडकर,यांच्या रिपब्लिकन सेनेनेही पाठिंबा दिला होता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ,माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. विद्यार्थ्यांच्या समितीने व त्यांना पाठिंबा दिलेल्या विविध संघटनांच्या कृती समितीने आज आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाची घोषणा केली होती.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सुजात आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर ,समन्वयक सुनील कदम, राष्ट्रवादीचे नेते समाजभूषण उत्तमराव गायकवाड, मेश्राम ,भीम आर्मीचे अशोक कांबळे ,गजानन शिरसाठ ,अमोल बोधिराज , प्रमोद नाईक, सोना कांबळे ,जयाताई बनसोडे अतुल बेल्लीकर यांच्यासह विविध पक्षसंघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आझाद मैदानावर जल्लोष करीत पाठिंबा दिलेल्यांचे आभार मानले. दरम्यान संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने काल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर सरकारी स्तरावरील चक्रे वेगाने फिरली सामाजिक न्याय साची सुमंत भांगे यांनी घाईघाईने जाहीर केलेली २०० विद्यार्थ्यांच्या यादीला दुपारी स्थागिती दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासवबत चर्चा करून तुमचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन पवार यांनी काल भेटावयास गेलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला दिले होते पवारांच्या मध्यस्थीची तसेच आंदोलकांचा रेटा व वाढता पाठिंबा पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला सह्याद्री विश्रांतीगृह येथे चर्चेसाठी बोलावले यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भागे देखील उपस्थित होते. यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर २०० ऐवजी सरसकट ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी, असा मुद्दाही यावेळी विद्यार्थ्यांनी मांडला. मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षापासून बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देश दिले.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *