Breaking News

सामाजिक

मराठी विश्वकोश आता संकेतस्थळ आणि मोबाईल अॅपवर विश्वकोशाची माहिती अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवापिढीपर्यंत पोहचविण्याचे मंत्री तावडे यांचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे काम अतिशय व्यापक असून विश्वकोशाचे १ ते २० खंड आणि कुमार विश्वकोश आदी माहिती डिजीटल स्वरुपात उपलब्ध होत आहे. अतिशय दुर्मिळ आणि एकत्रित माहिती शालेय, महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी व युवकांना मिळणेही आवश्यक असून आता ही मराठी विश्वकोशाची सर्व माहिती वेबसाईट आणि मोबाईल अॅपच्या अद्ययावत …

Read More »

आदीवासी आश्रमशाळांमध्ये आता इंग्रजी व सेमी इंग्रजीचे शिक्षण राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याची आदीवासी मंत्र्यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ५०२ शासकिय आदीवासी आश्रमशाळांपैकी ५० आश्रमशाळांमध्ये १ ली पासून इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात २ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेता येणे सुलभ होणार असल्याची माहिती आदीवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी दिली. मंत्रालयातील …

Read More »

देहव्यापारातील भगिनींकडून पूरग्रस्तांना ११ हजाराची मदत स्नेहालयाच्या मदतीने भगिनीचा पुढाकार

अहमदनगर: प्रतिनिधी देहव्यापारातील बळी महिलांतर्फे कोल्हापूर, सांगली ,बेळगाव भागातील पूरग्रस्तांसाठी आज ११ हजार रुपयांचा आर्थिक सहयोग देण्यात आला.यात ३ हजार रुपये रोख तर ८ हजार रुपये धनादेशाद्वारे शासनास देण्यात आले. यापूर्वी स्नेहालय-अनाम प्रेम परिवाराने पूरग्रस्त भागात २ ट्रकद्वारे पाठविलेल्या आणि वितरित केलेल्या वस्तुरूप सहयोगात ६० हजार रुपयांचा किराणा या महिलांनी …

Read More »

खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या विकासासाठी अमृतची स्थापना राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत (AMRUT- Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) ही संस्था स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर या स्वायत्त संस्थेची निर्मिती होणार असून त्यात या समाज समुहातील तरुणांच्या विकासासाठी …

Read More »

१.५० लाख राजपत्रित अधिकाऱ्यांकडून पूरग्रस्तांसाठी एकदिवसाचा पगार थेट पगारातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे शासनास विनंती

मुंबईः प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आलेल्या महापूरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या पूरग्रस्तांना जनतेचे सेवक या नात्याने राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागातील कार्यरत राजपत्रित अधिकाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने तसे पत्र राज्य शासनास दिले आहे. …

Read More »

विधवा-वृद्धांच्या अनुदानात भरीव वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात ६०० रुपयांवरून १००० रुपये वाढ करण्यासह एक अपत्य असणाऱ्या विधवांना ११०० रुपये तर दोन अपत्य असणाऱ्या विधवांना १२०० रुपयांचे अर्थसहाय्य देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रतिवर्षी १६४८ कोटींच्या खर्चासही …

Read More »

अ.भा. साहित्य महामंडळाच्या खात्यात ५० लाख रूपये जमा आचारसंहिता नको म्हणून आधीच साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध

मुंबईः प्रतिनिधी उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्य शासनाने दरवर्षीप्रमाणे रुपये ५० लाख इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी मंजूर करण्यात आलेले अर्थसाहाय्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ३० जुलै, २०१९ रोजीच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बँक …

Read More »

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तरांना ७ वा वेतन मंत्री डॉ.संजय कुटे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग व ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन मधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून यासंबधीचा शासन निर्णय ही निर्गिमित करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, सामाजिक आणि …

Read More »

डॉ.तडवीच्या आत्महत्येने झोपलेले डॉक्टर कोलकात्यातील मारहाणीने जागे झाले कोलकाता येथील डॉक्टरच्या मारहाणीचा निषेधार्थ मार्डचे डॉक्टर संपावर

मुंबईः प्रतिनिधी नायर हॉस्पीटल येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय डॉ. पायल तडवीचा तिच्या जातीवरून बोलल्याने आत्महत्या करावी लागली. या आत्महत्येच्या घटनेवर झोपलेल्या डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने झोपेचे सोंग घेतले. मात्र कोलकाता येथील एका डॉक्टरला मारहाण केल्याच्या निषेधार्थ राज्यातील याच संघटनेने एकदिवसीय संपाचे हत्यार उपसल्याने डॉक्टरांच्या सामाजिक जाणीवेबद्दल उलटसुलट चर्चेला सुरुवात …

Read More »

अक्कलकोट तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी रुपयांचा निधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार घोषणा

मुंबई : प्रतिनिधी अक्कलकोट नगर परिषदेच्या इमारत बांधकामासाठी १३ कोटी, येथे येणाऱ्या भाविकांच्या कार पार्किंग साठी ३ कोटी रु, शौचालय बांधकामांसाठी ३ कोटी रुपये आणि गार्डन विकासासाठी १ कोटी रुपये असे मिळून २० कोटी रुपये नगर विकास विभागाला दिले जातील असे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. काल अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या …

Read More »