Breaking News

सामाजिक

२०१८ सालचा राज्य वाड्ःमय पुरस्कार लाखे, डहाके, दळवींना मराठी भाषा विभागाकडून पुरस्कार जाहीर

मुंबईः प्रतिनिधी उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य व राज्याबाहेरील मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती करणाऱ्या लेखकांचा पुरस्काराने गौरव केला जातो. 2018 या वर्षात प्रथम प्रकाशित झालेल्या मराठी साहित्यास स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-2018 पुरस्कार जाहीर करण्यात आला …

Read More »

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना पत्रे, सर्वोच्च न्यायालयात याचिका आम्ही भारतीय लोक मंचच्यावतीने ५ हजार याचिका दाखल

मुंबईः विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या नागरीकत्व कायदा, नागरीक नोंदणी आदी कायद्यांच्या विरोधात कल्याण मधील आम्ही भारतीय लोक मंचच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना १० हजार पत्रे तर सर्वोच्च न्यायालयात ५ हजार याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती मंचचे समन्वयक अॅड. फाऊख निझामी यांनी दिली. केंद्राने लागू केलेला कायदा महाराष्ट्रात …

Read More »

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात निवेदन सादर

नागपूरः प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला वैद्यकीय शिक्षणात देण्यात आलेल्या आरक्षणाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान राज्य सरकारकडून निवेदन सादर केल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62 द्वारे राज्यातील सामाजिक व आर्थिक मागास समाज प्रवर्गास आरक्षण …

Read More »

नागरिकत्व कायदा विरोधी नागपूर, मालेगांव, मुंबईत मोर्चे दिल्लीत इंटरनेट सेवा बंद, लखनौमध्ये दगडफेक जाळपोळ, प.बंगालमध्ये भव्य रॅली

नागपूर/मुंबई/ मालेगांव- प्रतिनिधी नुकत्याच केंद्र सरकारने मंजुर केलेल्या नागरीकत्व कायद्याला दिवसेंदिवस विरोध होत असून सुरुवातीला दिल्ली आणि पश्चिम बंगालपर्यंत असलेले विरोधाचे लोण आता मुंबईसह महाराष्ट्रात आणि लखनौमध्ये पसरत चालले आहे. नागपूर आणि मालेगाव येथे या कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. तर मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने …

Read More »

२७९ फुलपाखरांच्या प्रजातींचे झाले मराठीत “बारसे” जैवविविधता मंडळाचा पुढाकार

मुंबई: प्रतिनिधी “नीलवंत हे नाव तुम्हास ठाऊक आहे का ?’’ निलवंत हे ब्ल्युमॉरमॉन या राज्य फुलपाखराच्या प्रजातीला दिलेले मराठी नाव असून हे नामकरण महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. देशात आढळून येणाऱ्या १५०० आणि महाराष्ट्रात आढळून येणाऱ्या २७९ फुलपाखरांची नावे इंग्रजीत आहेत. ही नावे …

Read More »

भीमा कोरेगाव, इंदू मिल आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या पीपल्स रिपाईचे जोगेंद्र कवाडे, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी भीमा कोरेगाव व इंदू मिल आंदोलनातील आंबेडकरी कार्यकर्ते व युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये आणि पीपल्प रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनामार्फत केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते …

Read More »

रोप वाटप करून मुरबाडमधील युवक-युवती करणार सत्यशोधक पध्दतीने विवाह लग्नाच्या मांडवातच पतीच्या साक्षीने पत्नीच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेल्या जातीअंताच्या चळवळीचा वारसा पुढे चालवित मुरबाडच्या एका युवकाने सत्यशोधक पध्दतीने आंतरजातीय लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच्याही पुढे आणखी एक पाऊल टाकत लग्न समारंभात नियोजित वधूचे पुस्तक प्रकाशित करण्याचा आणि उपस्थितांना पर्यावरण संवर्धानासाठी रोप वाटप करून समाजासमोर एक …

Read More »

भिमा-कोरेगांव प्रकरणी अहवाल सादर करण्यासाठी ४ महिन्यांची वाढीव मुदत कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर साक्षीपुरावे नोंदविण्याचे काम २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणार

मुंबई : प्रतिनिधी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने साक्षीपुरावे नोंदवण्याचे काम चालू ठेवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार साक्ष नोंदवण्याचे काम २५ ते २८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीमध्ये आयोगाच्या मुंबई कार्यालयात होणार आहे. त्यानुसार सुरुवातीस ज्या साक्षीदारांची साक्ष घ्यायची आहे त्यांना समन्स काढण्यात आले आहे. आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी आणखी ४ महिन्यांची मुदतवाढ …

Read More »

पेन्शनधारकांनी १ ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत हयातीचा दाखला सादर करा अधिदान व लेखा अधिकारी आदेश

मुंबई : प्रतिनिधी आखिल भारतीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी दिनांक १ नोव्हेंबर २०१९ ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत हयातीचा दाखला द्यावा असे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई यांनी केले आहे. प्रसिद्धीस पाठवलेल्या पत्रकात त्यांनी असे नमूद केले आहे की, निवृत्तीवेतनधारकांची …

Read More »

कौशल्य विकासच्या ३० दिव्यांग विद्यार्थ्यांकडून मंत्रालयात हेअर आणि फूट मसाजचे प्रात्यक्षिक कौशल्य विकास व उद्योग विभागातंर्गत प्रोत्साहनपर विशेष उपक्रम

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील दिव्यांगासह इतर बेरोजगारांसाठी महत्वाच्या ठरलेल्या कौशल्य विकास व उद्योग विभागाकडून आता थेट विद्यार्थ्यांनाच प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या विभागाकडून मंत्रालयातील प्रागंणात हेअर मसाज आणि फूट मसाजचे प्रात्यक्षिक ठेवले असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योग विभागाचे उपसचिव मांडवे यांनी दिले. या दिव्यांग तरूणांना …

Read More »