Breaking News

सामाजिक

मराठा आरक्षण वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात नाही नागपूर खंडपीठाचा निर्णय

नागपूर-मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण प्रश्नी मुंबई याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या शैक्षणिक सत्रात मराठा आरक्षण लागू होणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत १६ टक्के मराठा आरक्षण लागू केल्याच्या विरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल …

Read More »

आम्ही फक्त मराठा उमेदवारांच्या मागे मराठा क्रांती मोर्चा संयोजकांच्या निर्णयामुळे समाजात फाटाफूट

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उमेदवारांना पुढील राजकिय भवितव्य लक्षात घेवून अनेक सामाजिक संघटनांमध्ये पाठिंबा देण्याची चढाओढ लागली. मात्र विरोधकांना डावलत सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या विरोधात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून मुक मोर्चे काढले. परंतु पक्ष न पाहता फक्त मराठा समाजाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी घेतली. मात्र या …

Read More »

ठाण्यात प्रथमच भरणार ज्यू धर्मिय मराठी भाषिकांचा मेळा गोल्डा मेयर यांच्या पुस्तक प्रकाशनाला इस्त्रायलचे उप-मुख्याधिकारी निमरोद कलमार यांची उपस्थिती

ठाणेः प्रतिनिधी मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे व इंडस सोर्स बुक्स आयोजित सुप्रसिध्द लेखिका वीणा गवाणकर लिखित “गोल्डा: एक अशांत वादळ” या पुस्तक प्रकाशनाला इस्त्रायलचे भारतातील वाणिज्य दूतावासातील उप- मुख्याधिकारी निमरोद कलमार हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ठाण्यात राहणारे ज्यू धर्मिय मराठी भाषिकांचा मेळा भरणार आहे. मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे व इंडस सोर्स …

Read More »

बेरोजगार दिव्यांगांना २ एप्रिल ला नोकरी प्रशिक्षण मुलाखत २ महिन्याचे मोफत निवासी प्रशिक्षण देणार

अहमदनगरः प्रतिनिधी मुकबधीर-अस्थिव्यंग- अल्पदृष्टी दिव्यांगांचे बेरोजगारीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून अनामप्रेम मागील ५ वर्षापासून काम करीत आहे. या प्रकारच्या दिव्याग प्रौढ मुला-मुलींना नोकरी पूर्व प्रशिक्षण देणे, त्यांना प्रशिक्षित करून कंपन्या, मॉल्स,रिटेल आणि एम.आय.डी.सी मध्ये नोक-या उपलब्ध करून देण्याचे मिशन स्नेहालय संचलित अनामप्रेम संस्था चालवत आहे. या नोकरी प्रशिक्षण केंद्र २ …

Read More »

प्रा. केंद्रे, महादेवन आणि कोल्हे दांपत्याला पद्मश्री प्रदान महाराष्ट्रातील चार मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली: प्रतिनिधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नाट्यकर्मी प्रा. वामन केंद्रे, सामाजिक कार्यक्रर्ते डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे आणि गायक शंकर महादेवन या महाराष्ट्रातील मान्यवरांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने …

Read More »

समानतेची सुरुवात घराच्या चौकटी पासून करूया मुक्त पत्रकार सिध्दी बोबडे यांचा जागतिक महिला दिनानिमित्त खास लेख

गजबजलेल्या शहरात कामावरून घरी जाण्याची कसरत करत मोबाईल वर येणारे पोस्ट वाचत कशी बशी बस पकडली. मार्च उजाडला नव्हता की वुमेन्स डे च्या पोस्ट यायला सूरवात झाली. सहज म्हणून आठवलं गेल्या आठवड्यात मी गावाला गेले होते. अगदी दोन दिवसांची सुट्टी होती पण चार महिन्यांचा शिण निघाला. आज आठवडी बाजारात घरात …

Read More »

चला, मराठी ‘म्हण’ जपू या! मराठीचे ‘धन’ जपू या!

मराठी भाषा गौरव दिनी ज्येष्ठ नाटककार एलकुंचवार, भाषा अभ्यासक डॉ. कल्याण काळे, भाषासंवर्धक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा सन्मान  मुंबई : प्रतिनिधी २७ फेब्रुवारी, हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे भव्य आणि विविधांगी कार्यक्रमांच्या माध्यमातून …

Read More »

तृतीयपंथीयांनाही मिळणार सरकारी घर, शैक्षणिक, वैद्यकीय सुविधांचा लाभ

कल्याण आणि हक्कांचे करणार संरक्षण करणार असल्याची मंत्री बडोले यांची ग्वाही  मुंबई : प्रतिनिधी तृतीयपंथीय कल्याण मंडळाच्यावतीने तृतीयपंथीय नागरिकांना ओळखपत्र वितरीत केली जातील. त्यांना शिक्षणात सहाय्य होईल, अशी मॅट्रीकोत्तर शिष्यवृती देण्यात येईल, पात्र असूनही ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येईल. …

Read More »

पहिले ‘दक्ष’ पोलीस साहित्य संमेलन मुंबईत होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन मुंबई : प्रतिनिधी रात्रंदिवस बंदोबस्त, गुन्हेगारांचा शोध घेणाऱ्या पोलिसांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच पोलीसांच्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने ‘दक्ष’महाराज्य राज्य पोलीस साहित्य संमेलन २०१९ चे उद्घाटन सोमवारी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईतील …

Read More »

आदिवासींच्या वनहक्क सातबारा संदर्भात विशेष मोहीम राबवावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश  मुंबई : प्रतिनिधी आदिवासी बांधवांना वनहक्काचे सातबारा देण्यासंदर्भात विशेष मोहीम सुरु करुन हे काम एक महिन्यात पूर्ण करा. त्याचप्रमाणे एका एकर पेक्षा कमी जमीन त्यांना देऊ नका, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित विभागांना दिल्या. आदिवासी विकास विभागाच्यावतीने सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या …

Read More »