Breaking News

कौशल्य सेतूच्या विद्यार्थ्यांनो ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्ससाठी १५ मे पर्यंत अर्ज करा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सचा लाभ घेण्यासाठी संबंधित शाळेमार्फत १५ मे पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.

कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी मार्च २०१९ च्या इयत्ता दहावीच्या प्रमाणपत्र परीक्षेकरिता ट्रान्सफर ऑफ क्रेडिटसचा लाभ घेण्यासाठी माध्यमिक शाळेमार्फत राज्य मंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्ज करुन नोंदणी करावी. नमुना अर्ज मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करुन प्रिंट काढण्यासाठी उपलब्ध आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जांची प्रिंट काढून ६ मे २०१९ ते १५ मे २०१९ पर्यंत अर्ज भरावा. विद्यार्थ्यांनी हा अर्ज तो ज्या माध्यमिक शाळेतून अंतिमत: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ठ झाला आहे. त्या शाळेच्या मुख्याध्यापक/प्राचार्यांची सही व शिक्का घेऊन अर्ज विभागीय मंडळात जमा करावा. विद्यार्थ्यांनी अर्जासोबत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, सर्व परीक्षांचे गुणपत्रक आणि कौशल्य सेतू अभियान प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.

अर्ज विभागीय मंडळात जमा करताना त्यासोबतचे प्रक्रिया शुल्क ४० रुपये, गुणपत्रिका शुल्क १० रुपये असे एकूण ५० रुपयाचे शुल्क रोखीने अथवा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष विभागीय मंडळात जमा करावेत. धनाकर्ष विभागीय सचिव, विभागीय मंडळ यांच्या नावे काढण्यात यावेत. संबंधित शाळांनी ६ मे ते १६ मे २०१९ या कालावधीत संबंधित विभागीय मंडळात जमा करावेत. विदयार्थ्यांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार कौशल्य सेतू अभ्यासक्रमाच्या एका कामासाठी दोन विषयांचे याप्रमाणे विदयार्थ्यांच्या मागणीनुसार देय असलेल्या एक किंवा दोन वर्षांसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस देण्यात येतील.

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी शासन निर्णयातील तरतुदींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत तसेच माध्यमिक शाळांनी वेळेत याबाबत कार्यवाही पूर्ण करावी.

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *