Breaking News

८० टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना आता १००० रूपये प्रतिमाह अर्थसहाय्य सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
८० टक्के व अधिक दिव्यांगत्व असलेल्या निराधार व्यक्तींना आता दर महिन्याला १००० रूपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून दिव्यांग लाभार्थ्यासाठी उत्पन्न मर्यादाही २१ हजारावरून ५० हजार करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल १ लाख ३५ हजार ५१२ दिव्यांग लाभार्थींना याचा लाभ मिळेल तसेच उत्पन्न मर्यादा वाढवल्यामुळे लाभार्थ्यांची संख्याही वाढणारआल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिली. मंत्रालयातील आपल्या दालनात ते पत्रकारांसोबत बोलत होते.
संजय गाधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील ४० टक्के ते ७९ टक्केपर्यंत दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांना ८०० रुपये तर ८० टक्के व अधिक दिव्यांगत्व असलेल्यांना १००० रूपये प्रतिमाह अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पूर्वी अर्थसहाय्याची रक्कम ६०० रूपये देण्यात येत होती, अर्थसहाय्यात वाढ केल्यामुळे ३४ कोटी रूपयांचा अधिभार येणार असल्याचेअसेही बडोले यांनी सांगितले.
संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना अ गट, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ब गट, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना ८० टक्के व अधिक दिव्यांगत्व अशा सर्व गटातील लाभार्थ्यांची एकूण संख्या ३२ लाख ३४ हजार ८९१ आहे,
दिव्यांगांना अर्थसहाय्याच्या योजनांच्या लाभासाठी २१ हजार रूपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादा होती. त्यात वाढ करण्याची अनेक लोकप्रतिनिधींची मागणी होती. त्यामुळे ही मर्यादा २१ हजारावरून ५० हजार रूपये करण्यात आली. उत्पन्न मर्यादा वाढवल्यामुळे दिव्यांग लाभार्थींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे असेही बडोले म्हणाले.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *