Breaking News

मंत्र्यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूस मिळाली तातडीने मदत सुनिल केदार यांनी दाखविली तत्परता

नागपूर : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुभार्व रोखण्याकरिता लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे नागपूर जिल्हयातील हिंगणा येथील आंतरराष्ट्रीय धावपटू कु. ज्योती चव्हाण या खेळाडू समोर उदरनिर्वाहचा प्रश्न उपस्थित झाला व तिला कुटुंबाचा निर्वाह करणे कठीण झाले. त्यामुळे या परिस्थितीत तिला क्रीडा कौशल्य टिकऊन ठेवण्याकरिता पोषक आहाराकरिता तातडीची मदत म्हणून नागपूर जिल्हा क्रीडा परिषद खात्यातून २५ हजार रुपयाचा धनादेश क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते देण्यात आला.
जिल्हयातील मान्यता प्राप्त आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधून सहभागी झालेल्या ज्या खेळांडूची आर्थिक स्थिती हलाकीची असून कोविड-19 मुळे उदरनिर्वाह करण्यास आर्थिक अडचण भासत आहे अशा खेळाडूंची माहिती संकलित करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, उपसंचालक डॉ. सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी आशा मेश्राम आदी उपस्थित होते.
धावपटू क ज्योती चव्हाण हीने वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स इटली-२०१९ मध्ये भारताकडून द्वितीय स्थान प्राप्त केले असून या स्पर्धेत ती ११ व्या स्थानी राहलेली आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *