Breaking News

राकेश झुनझुनवाला यांची अकासा एअरही आता आकाशात झेपावणार नवीन विमान कंपनीला सरकारकडून परवानगी

मुंबई : प्रतिनिधी

शेअर बाजारातील बडे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअर या नवीन विमान कंपनीला सरकारकडून परवानगी मिळाली आहे. केंद्रीय नागरी नागरी उड्डायन मंत्रालयाने अकासा एअरलाईन्सला विमान उड्डाणाचा ना हरकत दाखला दिला आहे. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीअंतर्गत अकासा एअर सेवा देणार आहे.

कंपनीला आता नागरी हवाई वाहतूक महासंचालक यांच्याकडे एअर ऑपरेटर परमिटसाठी अर्ज करावा लागणार आहे. पुढील वर्षाच्या उन्हाळ्यात अकासा एअर आपली सेवा सुरू करणार आहे. विनय दुबे हे अकासा एअरचा कारभार सांभाळतील. विनय दुबे हे जेट एअरवेजचे माजी सीईओ आहेत. तर अकासाच्या बोर्डवर इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोषही असतील.

अकासा एअरचे सीईओ विनय दुबे यांनी सांगितले की, नागरी विमानोड्डाण मंत्रालयाने एनओसी दिल्याने आम्ही आभारी आहोत. आकासा एअरलाईन नियमात राहून सुरु करण्यासाठी रेग्युलेटरी अॅथोरिटीसोबत काम करणार आहोत. आकासा एअर ही भारतीयांसाठी सर्वात जास्त परवडणारी आणि ग्रीनेस्ट एअरलाईन असेल.

नुकतंच राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून या भेटीचा फोटो शेअर केला होता. पंतप्रधानानी राकेश झुनझुनवाला याना भटून खुप आनंद झाला असे म्हटले होते.

अकासा एअरची बोइंग आणि एअरबस या कंपन्यांसोबत सध्या विमान खरेदीबाबत चर्चा सुरु आहे. झुनझुनवाला यांनी  कासात २४७.५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आली. याशिवाय दुबईचे एक गुंतवणूकदार आणि न्यू होरायझन इन्व्हेस्टमेंट फंडाचे व्यवस्थापक माधव भटकुली यांनी ६.२४ कोटी रुपये गुंतविले आहेत.

कंपनीने पुढील उन्हाळ्यात आपली सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. पुढील ४ वर्षात ते आपल्या ताफ्यात १८० आसन क्षमतेची ७० विमाने सामिल करतील. ही विमानसेवा सर्वात स्वस्त भाडे असेल, असे झुनझुनवाला यांनी स्पष्ट केले. अकासा एअरलाईन्सने भारतीय हवाई क्षेत्राच्या कठीण स्पर्धेदरम्यान प्रवेश केला आहे. आम्ही नवीन शोध घेऊन येत आहोत. प्रवाशांना स्वस्त तिकिटे मिळतील आणि आरामदायी प्रवास होईल, असे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर म्हटले.

मागील आठवड्यात उद्योगपती रतन टाटा यांच्या समूहातील टाटा सन्सने तोट्यातील एअर इंडिया ही सरकारी विमान कंपनी खरेदी केली. टाटा पुन्हा विमान सेवा सुरु करणार आहे. त्यामुळे झुनझुनवाला यांनीही हवाई सेवेत पदार्पण केल्याने आता देशांत विमान सेवेत स्पर्धा दिसून येणार आहे.

Check Also

१८ ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने विमाने घेणार उड्डाण बुकींग मर्यादा काढून टाकली

मुंबई: प्रतिनिधी विमान कंपन्या आणि देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने विमान कंपन्यांना १८ ऑक्टोबरपासून सर्व जागांसाठी तिकीट बुक करण्याची परवानगी दिली आहे. कोविड रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे फ्लाइटवरील क्षमता मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विमानभाडे कमी होण्याची शक्यता आहे. हवाईवाहतूक मंत्रालयाने विमान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *