Breaking News

विधान परिषदेच्या एका जागेसाठी लाड आणि माने यांच्यात चुरस

मुंबई​,दि.३०​। प्रतिनिधी -​ येत्या ७ डिसेंबरला होणा​ऱ्या ​ विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काॅग्रेसचे दिलीप माने यांच्यात लढत होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या​ आजच्या​ दिवशी दोन्ही उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने ​ही​​ निवडणूक चुरशी होणार हे स्पष्ट झाले आहे.आता या पोटनिवडणूकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजाराला ऊत येवून फोडा​ ​फोडीचे राजकारण रंगणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणूकीकडे सर्व​च राजकीयांच्या​ नजरा लागल्या आहेत.​ दिल्लीवरून सुद्धा याम पोट निवडणुकीवर करडी नजर ठेवली जात आहे.​

​ ​उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता पण भाजपचे प्रसाद लाड आणि काॅग्रेसचे दिलीप माने या दोन्ही उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने निवडणूक अटळ आहे. सध्या विधानसभेत भाजपचे १२२, शिवसेनेचे ६३,काँग्रेसचे ४२,राष्ट्रवादी ४१,शेकाप ​३,​आणि बहुजन विकास आघाडीचे ​३,​अपक्ष ७, एमआयएमचे २ तर; सपा, रासपा,मनसे​,भारिप बहुजन​ आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाचे प्रत्येकी एक आमदार ​असे एकूण ​आहेत. उमेदवाराला जिंकण्यासाठी १४५ आकडा पार करावा लागणार आहे. त्यामुळे या निवडणूकीत फोडाफोडीचे राजकारण अटळ असून, मोठ्या प्रमाणात घोडे बाजार होण्याची शक्यता आहे.गुरूवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान घेण्यात येवून सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. शिवसेना आणि भाजपची युती असल्याने प्रसाद लाड यांचा विजय सहज होवू शकतो​.​ अशी शक्यता असली तरी या निवडणूकीत अदृश्य बाण चमत्कार करतील या आशेवर काॅग्रेस आहे.

सध्या विधानसभेत असणारे पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे-

भाजप-१२२ , शिवसेना-६३,काॅग्रेस-४२, राष्ट्रवादी-४१,शेकाप-३,बविआ-​२​,एमआयएम-२,अपक्ष-७,​भारिप बहुजन-१, सपा-१,​ ​मनसे-१,​ ​रासपा-१,​ ​कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया-१

Check Also

एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *