Breaking News

अर्जून खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मंत्री दानवे म्हणाले, त्यांनी विधानसभा… ती जागा भाजपाचीच

मागील काही वर्षात जालना आणि औरंगाबादेतील सत्ता संघर्षावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर हे आमने-सामने आले. मात्र आता अर्जून खोतकर यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्यानंतर दिल्लीला जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या उपस्थितीत दानवे यांच्याबरोबर समझौता केला. तसेच एकनाथ शिंदे गटात प्रवेशही केला. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी अर्जून खोतकर यांना सल्ला देत म्हणाले, मी ईडीच्या त्रासामुळे आलो किंवा माझ्या कुटुंबाला त्रास होता, असे न सांगता त्यांनी आगामी राजकीय व्यवस्था करण्यासाठी मी चाललो आहे, असे स्पष्टीकरण यापुढे द्यावे. त्यांनी विधानसभा लढवावी. मी लोकसभा लढवेन असे सांगत लोकसभेला स्पर्धा करायची नाही असा अप्रत्यक्ष सल्लाच खोतकरांना दिला.

अर्जुन खोतकर यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी शिवसेनेची साथ का सोडली, ते शिंदेसेनेत का आले याचे उत्तर तेच देऊ शकतात. आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नसून आमचे नाव वापरू नये. ईडी आमच्यामुळे नव्हे तर कदाचित त्यांच्या गोष्टी उघड्या पडल्या असतील म्हणून आली असेल. मी ईडीच्या त्रासामुळे आलो किंवा माझ्या कुटुंबाला त्रास होता, असे न सांगता त्यांनी आगामी राजकीय व्यवस्था करण्यासाठी मी चाललो आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी यापुढे द्यावे असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्यासमोर आमचे राजकीय मतभेत मिटलेले आहेत. पुढील काळात हे मतभेत पुन्हा निर्माण होणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ. अर्जुन खोतकर यांचे क्षेत्र वेगळे आहे. माझे क्षेत्र वेगळे आहे. त्यांनी विधानसभेवर दावा सांगावा. मी लोकसभेवर दावा सांगेन. माझा पक्ष जो निर्णय घेईन तो मी मान्य करेन. पण त्यांच्या क्षेत्रात त्यांनी काम करावे. मी त्यांना मदत करेन. पक्षात येणे किंवा जाणे हे नेत्याच्या स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असते. भारतीय जनता पक्ष स्वत:ला वाढवण्यााच प्रयत्न करतो. कोणालाही कमी लेखण्याचे आमचे काम नाही असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, दानवे-खोतकर वादात एकनाथ शिंदे यांचे साथीदार आणि समर्थक अब्दुल सत्तार यांनी मोठा पुढाकार घेतला होता. तसेच खोतकर-दानवे वाद मिटावा यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असल्याचेही सत्तार यांनी स्पष्ट केले होत.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *