Breaking News

नारायण राणे म्हणाले, मी उध्दव ठाकरेंना भेटणार…तर राऊतांना चपलेने मारतील संजय राऊत राज्यसभेत माझ्या शेजारी येऊन मला.. यांच्यावर गंभीर आरोप

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात कधीच राजकिय शत्रुत्व असल्याचे दिसून आले नाही. मात्र काही दिवसांपूर्वी सामना वर्तमानपत्रात आलेल्या लेखावरून नारायण राणे आणि संजय राऊत यांना गंभीर इशारा दिल्यानंतर मागील दोन दिवसांपासून नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला लागले. काल शुक्रवारी संजय राऊत यांनी राणेंवर पलटवार केल्यानंतर आज नारायण राणे यांनी राऊत यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले.

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी आज संजय राऊत यांच्यावर इशाऱ्यावर बोलताना म्हणाले, संजय राऊत राज्यसभेत माझ्याशेजारी येऊन मला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल सांगायचे. ते ऐकलं तर उद्धव व रश्मी ठाकरे राऊतांना चपलीने मारतील, असा गंभीर आरोप संजय राऊतांवर केला. ते शनिवारी (७ जानेवारी) मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, एक गोष्ट मी आज सर्वांना सांगतो की, एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. कशासाठी माहिती आहे का? कारण मी खासदार झाल्यानंतर राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचे. यावेळी ते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे.

तेव्हा संजय राऊत मला उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेंबद्दल जे सांगायचे ते मी आता उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. मी राऊतांनी सांगितलेली माहिती दिल्यावर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी संजय राऊतांना चपलाने मारलं नाही, तर मला विचारा, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

राऊतांनी शिवसेना वाढवली नाही, तर शिवसेना संपवली आहे. हा व्यक्ती मातोश्रीला सुरुंग लावणारा आहे. ते ज्याच्या खांद्यावर हात टाकतात, तो खांदा गळलाच म्हणून समजा, असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे मला पुन्हा संजय राऊतांबद्दल विचारू नका, असेही ते म्हणाले.

नारायण राणे म्हणाले, राम कदम तीन हजार लोकांना काशी आणि सारनाथला घेऊन चालले आहेत. हे पवित्र कार्य आहे. अशावेळी माध्यमं संजय राऊतांविषयी बोलत आहेत. मात्र, रामाचं कार्य असताना इथं रावणाचं काय काम आहे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

मला काम आहे, मी केंद्रीय मंत्री आहे. माझ्या अखत्यारित सहा कोटी ३० लाख उद्योजक आणि उद्योगपती आहेत. मी संपूर्ण राज्यात फिरतो आणि उद्योग-रोजगार वाढवण्याचं काम करतो. हा उद्योग संजय राऊतांना नाही, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी संजय राऊतांवर केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *