Breaking News

विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापती पदावर विरोधकांनी घेतला आक्षेप अखेर विरोधकांचा सभात्याग

विधान परिषदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच संपलं. नव्या मंत्र्यांची ओळख करुन दिल्यानंतर शेकापचे जयंत पाटील यांनी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरच आक्षेप घेतला. सभापती महोदया तुमच्यावर आक्षेप आहे असं ते म्हणाले. जे सभागृह आपण चालवत असताना ज्या या पदावर बसल्या त्यावेळी त्यांचा पक्ष नसतो असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेच्या अध्यक्षांचं पक्ष सदस्यत्व जातं. आम्ही कोर्टात जाणार नाही कारण ते तुमच्यासाठी सोपं आहे असंही शेकापचे जयंत पाटील भाजपा नेत्यांना उद्देशून म्हणाले. नीलम गोऱ्हे शिवसेनेत गेल्यामुळे जयंत पाटील यांनी त्यांच्या सभापती पदावरच आक्षेप घेतला.

पुढे बोलताना शेकापचे जयंत पाटील म्हणाले, सभापती महोदया तुमच्यावर आक्षेप आहे. जे सभागृह आपण चालवत असताना ज्या या पदावर बसल्या त्यावेळी त्यांचा पक्ष नसतो. विधान परिषदेच्या अध्यक्षांचं पक्ष सदस्यत्व जातं. आम्ही कोर्टात जाणार नाही कारण ते तुमच्यासाठी सोपं आहे असंही शेकापचे जयंत पाटील भाजपा नेत्यांना उद्देशून म्हणाले.

सभापतींना कोणताही पक्ष नसतो असं सांगत हा मुद्दा मांडायचा प्रयत्न केला यावरून विरोधक आक्रमक झाले. उपसभापती नियमांची पायमल्ली करत आहेत असा आरोप करत विरोधकांनी हौद्यात येऊन घोषणा दिल्या
यानंतर पॉईंट ऑर्डर द्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले की असं कधीही कुठल्याही वेळी सभापतींवर आक्षेप घेता येत नाही. त्याचे काही नियम आहेत. नियमांमध्ये बसत असेल तरच आक्षेप घेता येतो. त्यामुळे हा आक्षेप घेता येणार नाही. सभापतींना माझी विनंती आहे की आज शोक प्रस्तावासारखा महत्त्वाचा प्रस्ताव आहे अशावेळी नियमबाह्य कामकाज करता येणार नाही. त्यामुळे सन्मानिय सदस्य जो आक्षेप घेत आहेत तो नोटीस न देता सदस्यांना घेता येणार नाही अशी पॉईंट ऑफ ऑर्डर उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी नीलम गोऱ्हेंवर घेतलेला आक्षेप खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

यानंतर नीलम गोऱ्हे स्वतःच बोलायला उभ्या राहिल्या. मी विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांना बोलण्याची संमती दिली. मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे. पण मला एक बाब सांगायची आहे. तुम्हाला गोंगाट करायचा आहे, हुर्यो करायचा आहे तर आधी मी सांगू इच्छिते की शोक प्रस्तावाच्या दिवशी आपण दुसरा कुठलाही प्रस्ताव घेत नाही. आज माझी तुम्हाला विनंती आहे की आपण गटनेत्यांच्या मिटिंगला असतात तर मी वेळ निर्धारित केली असती. पण तुम्ही आला नव्हता, विरोधी पक्षनेते, गटनेते कुणीही आलं नाही. तुम्हाला माझ्यावर आक्षेप घेण्यासाठी वेळ दिली असती. उद्या त्याला संमती कधी द्यायची आपण पाहू. असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. यानंतर अध्यादेश वाचण्याचे निर्देश त्यांनी दिले.
त्यानंतरही विरोधी पक्षाच्या आमदारांनी गदारोळ घालण्यास तसेच सुरु ठेवून सभात्याग करत असल्याचे जाहिर करत विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजातून बाहेर पडले.

Check Also

सॅम पित्रोदा यांनी दिला काँग्रेसच्या पदाचा राजीनामा पोड कास्टमुळे टीकेचे धनी बनल्याने दिला अध्यक्ष पदाचा राजीनामा

सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले असून हा निर्णय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *