Breaking News

रिकाम्या खुर्च्यांमुळे मोदींकडून पवारसाहेब व राष्ट्रवादी टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
वर्धा येथील सभेत रिकाम्या खुर्च्या बघून मोदींचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी पवारसाहेब व राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
शरद पवारसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असे मोदी विचारत आहेत. परंतु देशात आणि राज्यात शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केले हे जगजाहीर आहे. मात्र पाच वर्षांत मोदींनी काय केले याबाबतचा जवाब द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
भाजप हा शेतमालाचे उत्पादन करणारा नाही तर शेतमालाची लुट करणारा पक्ष आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाच वर्षात न्याय देवू शकले नाहीत. सत्तेत ५ वर्षे असूनही पंतप्रधान मोदी हे पाच वर्षांपूर्वी जे आरोप करत होते तेच आरोप करत आहेत. पाच वर्षात कुठले आरोप सिद्ध केले कुठले प्रकल्प पूर्ण केले. तीन वर्षात ४० हजार किंमतीत वाढ झाली आहे. याचं उत्तर भाजप देत नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
शरद पवारसाहेब आणि अजितदादा पवार यांच्यात गटबाजी आहे. अजितदादा पवार पक्षात कुठे तरी अस्तित्व निर्माण करत आहेत असे तुम्ही बोलत आहात. अहो आमची परंपरा वडीलधारी आणि वयस्कर लोक ज्येष्ठ नेत्यांचा आदर करणारी आहे. पवार साहेब तर आमचे अध्यक्ष आहेत. त्यांचा आदर आमचा कार्यकर्ता ठेवतो आहे. परंतु तुमचे नेते अडवाणी यांनी तुम्हाला राजकारणात आणलं, तुम्हाला मुख्यमंत्री केलं. नेता केला त्यांची हालत तुम्ही काय केलात हे देश बघतोय असा टोलाही त्यांनी मोदी यांना लगावला.
आमची विकेट जाणार असं बोलत आहात. परंतु सभेचे मैदान रिकामे होते. याचा अर्थ जनताच तुमची विकेट घेणार आहे. इतरांकडे बोटे दाखवण्यापेक्षा आजच्या सभेचा राग तुम्हाला आला. त्यातूनच तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काढला आहे. परंतु तुम्ही कितीही राग काढला तरी जनताच २३ मे रोजी तुमची विकेट घेवून देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *