Breaking News

राजकारण

बारामतीत आता नणंद सुप्रिया सुळे आणि भावजय सुनेत्रा पवार मध्ये अधिकृत लढत

बारामती या शरद पवार यांच्या बालेकिल्ल्याला भाजपाने पध्दतशीर राजकीय ईडी-सीबीआयचा सुरुंग लावल्यानंतर पवार कुटुंबिय कधी नव्हे ते एकमेकांच्या राजकिय विरोधात उभे राहिले. अजित पवार यांच्यावरील आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळच्या सभेत केल्यानंतर एका आठवड्याच्या आत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित भाजपासोबत …

Read More »

काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ अर्चना पाटील यांचा भाजपात प्रवेश

माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेस चे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकुरकर यांच्या स्नुषा डॉ अर्चना पाटील यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, लातूरचे महायुतीचे उमेदवार भाजपा खा. सुधाकर श्रुंगारे, आ. संभाजी पाटील …

Read More »

अरूणाचल प्रदेशमध्ये निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाने १० जागा जिंकल्या

देशात सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जही सर्वपक्षिय उमेदवारांनी भरले आहेत. देशात सार्वत्रिक निवडणूकीबरोबरच काही राज्यांच्या अर्थात अरूणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यातील विधानसभा निवडणूकाही पार पडत आहेत. यापार्श्वभूमीवर अरूणाचल विधानसभा निवडणूकीत भाजपाने ३० मार्च २०२४ रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून चार उमेदवार आज जाहिर

काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाविकास आघाडीची पुण्यात जाहिर सभा पार पडली. त्या सभेत आणि इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यात शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बारामतीतील उमेदवार या सुप्रिया सुळे असतील अशी …

Read More »

सुनिल तटकरे यांची माहिती, राष्ट्रवादीच्या कोट्यातून महादेव जानकर यांना परभणी…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला रासपचे नेते महादेव जानकर, क्रीडामंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते. सुनिल तटकरे …

Read More »

राहुल गांधी यांची हमी, …लोकशाहीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

लोकसभा निवडणूकीला सुरुवात झाल्यानंतर आयकर विभागाने नव्याने काँग्रेस पक्षाला नोटीस पाठवित १८०० कोटी रूपयांचा दंड ठोठावला. मागील वर्षी आयकर परतावा दाखल आयकर विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आल्याने आयकर विभागाने ही नोटीस बजावली आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सत्ताधारी भाजपावर जोरदार निशाणा साधला. एक्स या …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स यांच्यात AI वर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्यात बदलते तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) शी संबंधित धोक्यांविषयी चर्चा करताना या नव्या तंत्रज्ञानाचे योग्य प्रशिक्षण दिले गेले नाही तर लोक तंत्रज्ञानाचा गैरवापर करू शकतात, अशी भीती पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत जर लोकांनी एआयला जादूचे साधन म्हणून वापरले तर …

Read More »

संजय राऊत यांचा हल्लाबोल म्हणाले, पंतप्रधान मनमोहन सिंग यांची माफी मागा

केंद्र सरकारच्या नियंत्रणात असताना एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स या दोन कंपन्याच्या एकत्रिकरणासाठी NACIL या कंपनीने विमान भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या अनियमिततेच्या चौकशीचा अहवालावरील क्लोजर रिपोर्ट २८ मार्चला सादर करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांना क्लीन चीट देण्यात आली. त्यावरून शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार, दोन तारखेपर्यंत भाजपाविरोधात मजबूत आघाडी

या लोकसभा निवडणूकीत आमचा प्रयत्न होता की, भाजपाच्या विरोधात मजबूत आघाडी व्हावी. पण दुर्दैवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे तशी होत नाही. विविध संघटनांशी बोलून दोन तारखेपर्यंत भाजपा विरोधातील मजबूत आघाडी उभी राहिलेली दिसेल, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. मुंबई दादर येथील डॉ …

Read More »

घड्याळ चिन्हावरून शरद पवार आणि अजित पवार गटात जुंपली

लक्षद्विपचे विद्यमान खासदार फैजल यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली. तसेच मागील निवडणूकीतही फैजल यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवित विजय मिळविला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात घड्याळ चिन्हाबाबत निर्णय दिला आहे. त्यामुळे फैजल यांच्याशिवाय घड्याळ चिन्ह दुसऱ्यांना मिळणार नाही अशी माहिती जयंत पाटील यांना त्यांच्या पक्ष कार्यालयात नुकत्याच आयोजित पत्रकार …

Read More »