Breaking News

राजकारण

शरद पवार यांची माहिती, दोन तीन दिवसात नवा उमेदवार देऊ…

सातारा जिल्हा हा स्व. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर विश्वास असणारा जिल्हा आहे. पक्षाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर साताऱ्याच्या जनतेचे राष्ट्रवादीवर विशेष प्रेम आहे. साताऱ्यातील उमेदवाराबाबत एक दोन दिवसात निर्णय जाहीर करण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथील …

Read More »

आयकर विभागाची काँग्रेसला पुन्हा १ हजार ८२३ कोटी रूपयांची नवी नोटीस

लोकसभा निवडणूका जाहिर झाल्यापासून काँग्रेसच्या मागे आयकर विभागाने सातत्याने नोटीसींचा सिलसिला सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने १४ लाख रूपयांसाठी ११० पट्टीत दंडाची रक्कम ठोठावत काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठावली. त्यानंतर गेल्यावर्षीच्या टॅक्स रिटर्नमधील तफावतीवरून १ हजार ८२३ कोटी रूपयांची काँग्रेसला पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. या नोटीशीची माहिती …

Read More »

वकिलांच्या पत्राची पंतप्रधान मोदींकडून तात्काळ दखल तर काँग्रेसचा पलटवार

देशभरातील विविध न्यायालयात भाजपाच्यावतीने न्यायालयात वकीलपत्र दाखल करत कायदेशीर बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांच्यासह मानन कुमार मिश्री, अदिश अगरवाल, चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, उज्वला पवार, उदय होल्ला, स्वरूपमा चतुर्वेदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांना पत्र लिहित न्यायपालिकेच्या कारभाराच्या अनुषंगाने काही मुद्दे उपस्थित केले. …

Read More »

शिवसेना शिंदे गटाची लोकसभा ८ उमेदवारांची यादी जाहिरः उबाठा गटाशी संघर्ष

देशातील लोकसभा निवडणूकांचा रणसंग्रामाला चांगलीच सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी सर्वच राजकिय पक्षांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच लगबग सुरु केली होती. त्यातच शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात चर्चित चेहऱ्याने अर्थात गोविंदा आहुजा यांनी प्रवेश …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, रामटेकच्या काँग्रेस उमेदवाराचे जात प्रमाणपत्र रद्दची कारवाई राजकीय द्वेषातून

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार असल्याचे चित्र देशात आहे. या पराभवाच्या भितीने भाजपाला ग्रासले असून त्याच भितीतून ते विरोधी पक्षांच्या विरोधात षडयंत्र करत आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई ही राजकीय सुडबुद्धीतून केलेली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ३७ स्टार प्रचारक

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी ३७ जणांची स्टार प्रचारक यादी राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी जाहीर केली आहे. या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे …

Read More »

काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द, विजय वडेट्टीवार यांचे टीकास्त्र

रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीत रद्द करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या ऐवजी त्यांचे पती यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहिर करण्यात येणार आहे. मात्र रश्मी बर्वे यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याच्या घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, रामटेक लोकसभा मतदारसंघातून …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून आदर्श आचारसंहितेचा भंग…

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून निवडणुक आयोगाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सुप्रीम कोर्टात अद्याप प्रलंबित आहे, त्याचा निकाल लागलेला नाही असे असताना बावनकुळे यांनी निकाल लागला असल्याचा दावा करुन मा. न्यायालयाचा अवमान केला आहे, हा …

Read More »

अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच

दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम दिलासा नाकारला. गेल्या आठवड्यात मद्य धोरण प्रकरणी अटक करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांनी दारू धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी झाली. अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलांनी २८ मार्चपर्यंत …

Read More »

आता महुआ मोईत्रा आणि दर्शन हिरानंदानी यांना ईडीची नोटीस

सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीला २८ मार्च रोजी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या TMC महुआ मोईत्रा आणि उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना परदेशी चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) उल्लंघन प्रकरणात चौकशीसाठी नवीन समन्स जारी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या आधारे द हिंदू या दैनिकाच्या संकेतस्थळाने दिले. ४९ वर्षीय तृणमूल काँग्रेस नेत्या महुआ मोईत्रा यांना यापूर्वीही केंद्रीय …

Read More »