Breaking News

शिवसेना शिंदे गटाची लोकसभा ८ उमेदवारांची यादी जाहिरः उबाठा गटाशी संघर्ष

देशातील लोकसभा निवडणूकांचा रणसंग्रामाला चांगलीच सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी सर्वच राजकिय पक्षांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच लगबग सुरु केली होती. त्यातच शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात चर्चित चेहऱ्याने अर्थात गोविंदा आहुजा यांनी प्रवेश केल्यानंतर काही वेळातच शिवसेना एकनाथ शिंदे गटाने त्यांच्या हिश्याला आलेल्या ८ जागांवरील उमेदवार जाहिर करण्यात आली.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाने दक्षिण मध्य मुंबईतून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना, कोल्हापूरातून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या विरोधात संजय मंडलीक यांना, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलढाणा येथून प्रतापराव जाधव, हिंगोली तून विद्यमान खासदार हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून काँग्रेसचे विद्यमान आमदार तथा शिंदे गटात नुकतेच प्रवेश केलेले राजू पारवे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर हातकणंगले येथून धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाने समर्थकांना उमेदवारी जाहिर करताना थेट शिवसेना उबाठा गटाशी संघर्ष होणार नाही या दृष्टीने काळजी घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही गटाकडून जाहिर करण्यात आलेल्या उमेदवारांपैकी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल देसाई यांचा सामना शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांच्याशी थेट होणार आहे. त्याचबरोबर बुलढाणा येथे शिवसेना उबाठा गटाचे नरेंद्र खेडेकर आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या प्रतापराव पाटील यांच्यात थेट सामना होणार आहे. तर हिंगोलीत शिवसेना उबाठा गटाच्या नागेश पाटील आष्टीकर आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या थेट सामना होणार आहे. तर शिवसेना उबाठा गटाचे संजय वाघेरे आणि शिवसेना एकनाथ शिंगे गटाचे श्रीरंग बारणे यांच्यात लढत होणार आहे. याशिवाय शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटाचे भाऊसाहेब वाघचौरे आणि शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे याच्यात लढत होताना दिसून येणार आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाने जाहिर केलेले उमेदवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांनी जाहिर केलेले उमेदवार यातील एकूण पाच लोकसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा विरूध्द शिवसेना एकनाथ शिंदे असा सामना रंगणार आहे.

त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे गटातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ८ जागा भाजपाने दिल्या आहेत. तर उर्वरित चार जागी असलेले उमेदवार हे भाजपाच्या कमळ या चिन्हावर लढविणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव असलेले डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय होऊ शकला नाही.

Check Also

एनआयएकडून रामेश्वरन कॅफे स्फोटप्रकरणातील आरोपींना अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटामागील मुख्य आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *