Breaking News

काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द, विजय वडेट्टीवार यांचे टीकास्त्र

रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीत रद्द करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या ऐवजी त्यांचे पती यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहिर करण्यात येणार आहे. मात्र रश्मी बर्वे यांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याच्या घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे या निवडणुकीत पारडे जड आहे. त्यामुळेच त्यांच्या विरोधात साम दाम दंड भेद सूत्राचा वापर भाजपाने सुरू केला. लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या देशाच्या लोकसभा निवडणुकीत सरकारी यंत्रणांचे निःपक्ष वागणे अपेक्षित असताना यंत्रणा याविरुद्ध आचरण करत आहे. त्यामुळेच रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र समितीने रद्द केले असल्याची टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकशाही मार्गाने, जनतेच्या दरबारात जाऊन निवडणूक लढणाऱ्या रश्मी बर्वे यांच्यावर आज अन्याय झाला आहे. कायद्यानुसार १७ फेब्रुवारी २०२० ला रश्मी बर्वे यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले होते, त्यामुळे जात पडताळणी समितीला हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार नाही.
समितीने अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन हा निकाल दिला आहे, त्यामुळे या समिती वर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी असल्याचेही यावेळी सांगितले.

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, जी समिती जात प्रमाणपत्र देते ती समिती जात वैधता प्रमाणपत्र रद्द करू शकत नाही. जात प्रमाणपत्राबाबत समितीने २० मार्च रोजी नोटीस दिली आणि आठ दिवसात हे प्रमाणपत्र रद्द केले. नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केले होते, सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित राहून पाच वर्ष खासदारकी पदावर राहिल्या, आणि आता भाजपाने उमेदवारी दिली अशी खोचक टीकाही यावेळी केली.

इतकं झालं तरी काँग्रेस लढत राहणार, न्यायालयात आम्ही दाद मागणार असल्याची माहितीही विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Check Also

एनआयएकडून रामेश्वरन कॅफे स्फोटप्रकरणातील आरोपींना अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटामागील मुख्य आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *