Breaking News

युक्रेनमधील विद्यार्थ्यांपेक्षा पंतप्रधानांना या देशातील निवडणूका महत्त्वाच्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणा; आठ दिवसापूर्वीच्या ट्वीटची जयंत पाटील यांनी करुन दिली आठवण

शिक्षणासाठी भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप परत आणा असे पंतप्रधानांना ट्वीट करुन सांगितले होते. परंतु त्यांना उत्तर प्रदेश आणि इतर निवडणूकांपेक्षा या देशात काहीच महत्वाचे वाटत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला.
माध्यमांनी युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले असून भारतातील विद्यार्थी अडकले असल्याचे विचारले असता जयंत पाटील यांनी केलेल्या ट्वीटची आठवण करून दिली.
ज्यावेळी निवडणूका देशात सुरू होतात, त्यावेळी केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांना कशातच रस नसतो असा अनुभव आहे असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
युक्रेन मध्ये आपले विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परत आणा असे आठ दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या प्रमुखांचे लक्ष ट्विटच्या माध्यमातून वेधले होते. परंतु कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
युक्रेन मध्ये कालपासून युध्द सुरू झाले आहे. या संकटात विद्यार्थी सापडले आहेत. मी ट्विट करुन मागणी केली. त्याचवेळी प्रयत्न केला असता तर आज विद्यार्थी सुरक्षित राहिले असते. आज ते असुरक्षित आहेत. याची नोंद अगोदरच घ्यायला हवी होती. परंतु केंद्र सरकारने घेतली नाही आतातरी नोंद घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर काँग्रेस नेत्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करत आणि वैयक्तिक पत्र लिहीत युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी केली होती. परंतु नेहमीप्रमाणे कोरोनात जसे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. तसेच ऐन लष्करी कारवाईला सुरुवात झाल्यानंतर एअर इंडियाची दोन विमाने युक्रेनला पाठविण्यात आली. परंतु तो पर्यत युक्रेनने आपले विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *