Breaking News

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रीच बोलले बच्चू कडू संवेदनशील नेते आहेत

अमरावतीच्या अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद टोकाला पोहचल्याचे मागील काही दिवसांमध्ये दिसून आले आहे. दोघांकडूनही ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे. अलीकडेच राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले असून त्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत आमदार रवी राणा यांना प्रत्युत्तर दिलं. शिवाय “राणांच्या आरोपानंतर आम्ही त्यांना १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे. कोणावर आरोप करताना पुरावे असेपर्यंत बोलून नये, असा साधारण नियम आहे. याबाबतीत आम्ही न्यायालयात जाणार आहोत” असेही बच्चू कडू म्हणाले आहेत. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलतान खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, बच्चू कडू हे एक संवेदनशील नेते आहेत. हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. याचं कारण असं आहे की, मी स्वत: ५० खोक्यांबद्दल एवढ्यासाठीच बोलले, याचं कारण ५० खोक्यांचा आरोप झाला ते कोणी घेतले नाही हे कोणीच म्हटलं नाही. उलट या ईडी सरकारमधील एक मंत्री मी ऑनरेकॉर्ड या वृत्तवाहिनीवरच मी पाहिले, की ते असं म्हणालेत की तुम्हाला ५० खोके हवे आहेत का? त्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाला की असा काहीतरी व्यवहार झाला असावा. अशी एक साधरणपणे जनतेच्या मनता शंका आली असावी.

त्यामुळे सातत्याने ५० खोके बद्दल जी चर्चा होते, ती समाजात सगळीकडे व्हायला लागली. गाव, वाडी, वस्तीवर जरी तुम्ही भाषण करायला गेलात, तर खालून लगेच म्हणतात हे ताई बघा ५० खोके वाले आहेत. त्यामुळे ही गाव, वाडी, वस्तीपर्यंत पोहचलेली गोष्ट आहे. याशिवाय मला आनंद वाटतोय की या राज्यात सत्तेत असणारं कोणीतरी संवेदनशील आहे.त्यामुळे मी बच्चू कडू यांचे आभार मानते की त्यांनी आरोग्य क्षेत्रात अपंगांसाठी इतकं प्रचंड काम केलय आणि त्यांच्या वेदना व त्यांचा संवेदनशीलपणा हा त्यांच्या वक्तव्यातून दिसला आहे. मला आनंद वाटतो की सत्तेतील कोणतरी संवेदनशील राजकारणी या राज्यात आहेत असंही त्या म्हणाल्या आहेत.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *