Breaking News

बाळासाहेब थोरात यांचा सत्ताधाऱ्यांना चिमटा, आज तुम्ही तिकडे जाऊन बसला नाहीतर तुम्ही…. भविष्यात पायाभूत प्रकल्प निर्माण करत असताना पर्यायी व्यवस्था करण्याच्या अध्यक्षांकडून मंत्र्यांना सूचना

नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्री महोदय सांगतात ऑगस्ट २०२४ पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे, नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात मंत्र्यांना सुनावत म्हणाले, मंत्री छगनराव भुजबळ, दादा भुसे अनिल पाटील हे मंत्री सुद्धा याच मार्गावरून प्रवास करतात. मला माहित नाही ते प्रवास करताना रस्त्याचा, रेल्वेचा, विमानाचा वापर करतात? मंत्री महोदयांसह छगन भुजबळ सुद्धा माझ्या या मताशी सहमत असते. आज तुम्ही तिकडे जाऊन बसलात नाहीतर तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या विषयात आरडाओरडा केला असता अशी चिमटाही ही काढला.

विधानसभा सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान आमदार रईस शेख यांनी नाशिक-मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री दादा भूसे म्हणाले की, या महामार्गावर असलेले खड्डे पूर्णत भरले जातील. आणि तसेच या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने पर्यायी मार्गाचाही विचार केला जाईल. त्यावर येत्या आठ दिवसात तुम्हाला फरक दिसेल असे आश्वासन देत एलेव्हेटेड कॉरिडॉरबाबतचाही निश्चित विचार केला जाईल असे आश्वासन दिले. मंत्री दादा भुसे यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने संतापलेल्या बाळासाहेब थोरात यांनी या प्रश्नाचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, भिवंडी बायपास ते ठाणे या प्रवासामध्ये प्रवाशांना दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगांचा सामना करावा लागतो. मी देखील या रस्त्यावरून प्रवास करतो. जळगाव धुळे अहमदनगर आणि विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे याच मार्गावरून मुंबई मध्ये येतात. या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे. मंत्री छगनराव भुजबळ, दादा भुसे अनिल पाटील हे मंत्री सुद्धा याच मार्गावरून प्रवास करतात. मला माहित नाही ते प्रवास करताना रस्त्याचा, रेल्वेचा, विमानाचा वापर करतात? मंत्री महोदयांसह छगन भुजबळ सुद्धा माझ्या या मताशी सहमत असते. आज तुम्ही तिकडे जाऊन बसलात नाहीतर तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या विषयात आरडाओरडा केला असता असा चिमटाही सत्ताधारी मंत्र्यांना काढला.

त्यानंतर बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, एक दिवस मी सुद्धा दोन किलोमीटर पायी प्रवास या रस्त्याने केला होता. ॲम्बुलन्स मला या प्रवासात वाहतूक कोंडी मध्ये अडकलेल्या दिसल्या. वाहतूक कोंडीचा प्रश्न कोणत्याही सबबीवर सोडवावा लागेल, मंत्रिमहोदय उत्तरात सांगतात की ऑगस्ट २०२४ पर्यंत ही वाहतूक कोंडीची समस्या कायम राहील. मंत्री महोदय असे चालणार नाही हा प्रश्न गंभीर आहे. तुम्हाला तातडीने याच्यावर उपाययोजना कराव्या लागतील.

यावर मंत्री महोदय दादा भुसे यांनी, मी स्वतः मागील आठवड्यात या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आहे तिथे ज्या ज्या उपायोजना कराव्या लागतील त्या उपाययोजना करून आठवडाभरात तुम्हाला तिथे किमान ५० टक्के बदल झालेला दिसेल असे सांगितले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री महोदयांना सांगितले की, राज्यात अनेक ठिकाणी पायाभूत प्रकल्पांचे काम सुरू आहे. भविष्यात असे पायाभूत प्रकल्प करत असताना आपण पर्यायी व्यवस्था देखील उपलब्ध करून दिली पाहिजे त्या संदर्भात भविष्यात आपण काळजी घ्यावी अशा सूचना केल्या.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *