Breaking News

गृहनिर्माणशी फटकून वागणाऱ्या अधिकाऱ्याची त्याच विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती पाच महत्वाच्या सनदी अधिका-यांच्या बदल्या

मुंबई : प्रतिनिधी

शहरातील महत्वाच्या धारावी पुर्नवसन प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क ठेवत फाईल प्रक्रियेतून गृहनिर्माण विभागाला वगळणारे सनदी अधिकारी ई.व्ही. श्रीनिवास यांची नियुक्ती गृहनिर्माण विभागाचे पूर्णवेळ सचिव म्हणून गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या आग्रहामुळे राज्य सरकारने आज नियुक्ती केली. विशेष म्हणजे गृहनिर्माण विभाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर श्रीनिवासन यांच्याकडे गृहनिर्माण विभागाचा तात्पुरता पदभार सोपविण्यात आला होता. तर त्यांच्याकडे मुळ पदभार आयटी विभागाचा होता.

त्यांच्यासह राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर राजीव जलोटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे या पदावरील सचिव सौरभ विजय यांची बदली करण्यात आली असून त्यांना वैद्यकीय शिक्षण आणि औषध प्रशासन हा विभाग देण्यात आला. तर सध्या माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिवपदावर कार्यरत असणारे  एस व्ही आर श्रीनिवास यांच्याकडे या विभागाचा आता तात्पुरता पदभार सोपविण्यात आला.  जलाज शर्मा यांची नियुक्ती नागपूर महापालिकेत आतिरिक्त महापालिका आयुक्त या पदावर करण्यात आली आहे. तर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सध्याचे सचिव डॉ संजय मुखर्जी यांची बदली करण्यात आली असून त्यांना सांस्कृतिक कार्य विभाग सोपविण्यात आला आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *