Breaking News

Tag Archives: housing dept.

म्हाडाच्या तिजोरीत १४०० कोटी; प्रकल्प ३७ हजार कोटींचे, कसे पूर्ण करणार ? बीडीडी चाळ पुनर्विकास आणि ठाणेतील जागेसाठी पैसे कसे उभे करण्याचा प्रश्न

मराठी ई-बातम्या टीम ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प दोन वर्षाच्या उशीराने सध्या सुरु झालेला दिसत असला तरी या प्रकल्पासाठीची ३५ हजार कोटींची लायबलीटी निधी म्हाडा कशी देणार असा प्रश्न सध्या महाविकास आघाडीला पडला असून त्यातच आता ठाणे येथील मफतलाल जमिनीची खरेदी करण्यासाठी पैसा कोठून आणायचा असा …

Read More »

“लक्ष्मी” सहाय्याने बदली करून घेतलेले म्हाडाचे ४० अधिकारी ईडीच्या रडारवर ? घाबरलेले अधिकारी म्हणतात फोनवर काही बोलू नका

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील अनेक महिन्यांपासून लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या काळात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली मोक्याच्या जागी वर्णी लागावी यासाठी लक्ष्मी नामकच्या सहाय्याने इच्छितस्थळी जागा पटकाविल्याची चर्चा म्हाडा परिसरात सुरु असून त्या आधारे म्हाडाचे तब्बल ४० अधिकारी ईडीच्या रडारवर असल्याची माहिती पुढे येत आहे. मंध्यतरीच्या काळात अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या स्पेशल …

Read More »

अविघ्न पार्कमधील १८० सदनिका वाटपाचा म्हाडाने पाठविलेला अहवाल गेला कुठे? म्हाडाच्या वाटपावर गृहनिर्माण विभागाने घेतला होता आक्षेप

मुंबई: विशेष प्रतिनिधी लोअर परेल आणि माझंगाव येथील अविघ्न पार्क इमारतीतील १८० सदनिका म्हाडाच्या आरआर अर्थात दुरूर्ती व पुर्नरचना मंडळाला मिळाला. परंतु या सदनिका मास्टरलिस्टमधील नागरीकांना मिळण्याऐवजी भलत्याच व्यक्तींना देण्यात आल्याची धक्कादायक पुढे येत असून याप्रश्नी राज्याच्या गृहनिर्माण विभागाने अहवाल मागवून महिनोनमहिने उलटून गेले मात्र त्याबाबतचा अहवाल म्हाडाने अद्याप गृहनिर्माण …

Read More »

पोलिसांच्या २ लाख हक्काच्या घरासाठी नगरविकास विभागाचा पुढाकार गृह आणि गृहनिर्माण विभागाच्या समन्वयाने लवकरच धोरण अंतिम

मुंबई : प्रतिनिधी पोलिसांच्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागून निवृत्तीनंतर त्यांची घरासाठीची वणवण थांबावी, यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी नगरविकास विभाग विशेष धोरण तयार करत असून गृह आणि गृहनिर्माण या विभागांच्या समन्वयाने लवकरच त्याला अंतिम स्वरूप देऊन मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

राज्य सरकारमुळे म्हाडा बनली दात व नखे काढलेला वाघ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ८ कलमी अधिकाराचे विभागाला पत्र

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सर्वसामान्य नागरीकांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने म्हाडाची स्थापना केली. तसेच म्हाडाच्या माध्यमातून जास्तीत जास्त घरांचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी यापूर्वीच्या सरकारांनी म्हाडाला स्वायत्त बनविण्यासाठी अनेक अधिकार दिले. मात्र आता महाविकास आघाडी सरकारला म्हाडाच्या प्रत्येक गोष्टीची माहिती व्हावी यासाठी म्हाडाचे जवळपास सर्वच महत्वाचे …

Read More »

उद्योगासह चार खाती चालवायला सरकारने माणसे आऊटसोर्सिंग केलीत का? भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र सरकार हे आपले सरकार आहे असे प्रचार करते पण शासनाची चार खाती मंत्री किंवा अधिकारी नाही पण वेगळीच माणसे चालवत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशांत बिलावकर, उद्योग विभाग गिरीश पवार, नगर विकास विभाग अजय आशर, गृहनिर्माण विभाग किर्तीकुमार केडियार हे चालवत आहेत. या व्यक्ती कोण आहेत. तर …

Read More »

बिल्डरांच्या नोंदणीची अट गृहनिर्माणने काढून टाकली मात्र या गोष्टी केल्या बंधनकारक राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

मुंबई : विशेष प्रतिनिधी शहरातील जून्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुर्नविकासासाठी काही दिवसांपूर्वी म्हाडाकडे बिल्डरांनी नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र त्यास बिल्डरलॉबीकडून विरोध होवू लागताच ही अट रद्द करत सदर इमारतीचा पुर्नविकास ३ वर्षात पूर्ण करणे बंधनकारक करण्याचा निर्णय कायम ठेवत नवी नियमावली गृहनिर्माण विभागाने आज एका आदेशान्वये …

Read More »

मुंबई महानगरातील ८ महानगरपालिका व ७ नगरपालिकांसाठी स्वतंत्र एसआरए प्राधिकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय

मुंबई: प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील (MMR Region) ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिकांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या प्राधिकरणाचे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे  (MMR-SRA) चे मुख्यालय ठाणे …

Read More »

गृहनिर्माणशी फटकून वागणाऱ्या अधिकाऱ्याची त्याच विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती पाच महत्वाच्या सनदी अधिका-यांच्या बदल्या

मुंबई : प्रतिनिधी शहरातील महत्वाच्या धारावी पुर्नवसन प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क ठेवत फाईल प्रक्रियेतून गृहनिर्माण विभागाला वगळणारे सनदी अधिकारी ई.व्ही. श्रीनिवास यांची नियुक्ती गृहनिर्माण विभागाचे पूर्णवेळ सचिव म्हणून गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या आग्रहामुळे राज्य सरकारने आज नियुक्ती केली. विशेष म्हणजे …

Read More »

सामान्य प्रशासनाच्या आदेशाला “गुच्छ” मुळे महसूलकडून केराची टोपली त्या अधिकाऱ्यांना रूजू न करून घेण्याचे आदेश गृहनिर्माण विभाग लवकरच काढणार

मुंबई : विशेष प्रतिनिधी म्हाडा आणि एसआरएमधील अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या पदावरील व्यक्तीची प्रतिनियुक्ती करायची असेल तर गृहनिर्माण विभागाची मंजूर घेणे आवश्यकच करण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने दिला. तरीही महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या “गुच्छ” मुळे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवित दोन अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती महसूल विभागाने केल्याचा …

Read More »