Breaking News

एकनाथ खडसेंना अडकविण्याची सुपारी भाजपच्याच ज्येष्ठ मंत्र्यांची सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांचा खळबळजनक आरोप

मुंबई : प्रतिनिधी

जमिन घोटाळा आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबध असल्याच्या आरोपावरून मंत्री पदावरून पाय उतार झालेले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अडकवण्यासाठी भाजपाच्याच एक ज्येष्ठ मंत्र्यांनी सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप अण्णा हजारे यांच्या कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी केला.

एकनाथ खडसे यांना खोट्या केसेसमध्ये अडकाविण्यासाठी झालेल्या कटाची माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यासंदर्भात तीन वर्षांपूर्वी अंजली दमानिया यांच्या घरी बैठक झाली असल्याचा खळबळजनक आरोप करत यावेळी त्यांनी दमानिया यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. इनामदार यांनी यावेळी सांगितले की , मी उद्योजक आहे. माझ्या मिळकतीतून मी अण्णांच्या आंदोलनाचा खर्च केला आहे. तसेच हा संपूर्ण व्यवहार मी चेक ने केला आहे.  यात कोणत्याही भ्रष्ट्राचाराचा पैसा नाही. माझा सर्व आर्थिक व्यवहार आणि बँक स्टेटमेंट्स मी पोलिसांना द्यायला तयार आहे. पोलिसांनी याची चौकशी करावी. उलट अण्णांच्या आंदोलनाला भ्रष्ट्राचाराचा पैसा लागला आहे,असा आरोप करून दमानिया यांनी अण्णांचा अपमान केल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

छगन भुजबळ यांच्या सोबत मी कधीही काम केले नाही.भुजबळ यांनी चौकशी करताना इडीने त्यांच्या नोकराला ही आरोपी केले.  तर मग ईडीने  माझी चौकशी का केली नाही. दमानिया यांच्या विरोधात एक कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असल्याचेही त्यांनी यावेळी केला.

अंजली दमानिया यांच्या घरी १२ डिसेंबर २०१५ ला झालेल्या बैठकीत दमानिया यांचे पती अनिष दमानिया , बिल्डर राजेश खत्री आणि ललित टेकचंदानी यांची बैठक झाली होती. मलाही एकनाथ खडसे यांनी अडकवण्यासाठी गळ घालण्यात आली होती. मात्र मी हे काम करण्यास नकार दिला होता. याची शहानिशा करण्यासाठी दमानिया यांच्या घरी आलेल्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणीही इनामदार यांनी केली आहे. दमानिया यांनी माझ्यावर केलेले आरोपांची तीस दिवसात चौकशी करावी अन्यथा एकतीसाव्या दिवशी मी आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.

वेळो वेळी दमानिया आपले विधान बदलत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशी करावी असे आव्हान देत त्यास मी तयार आहे, तर दमानिया यांनीही चौकशीला सामोरे जावे असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.

 

Check Also

वंचितच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या वाहनावर हल्ला

वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *