Breaking News

दिपक केसरकर म्हणाले, बच्चू कडूंसोबत फक्त दोन आमदार

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप व शिवसेनेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून झालेलं इनकमिंग, तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. ही स्थापन करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी भल्या सकाळी केलेला शपथविधी, एकनाथ शिंदे यांचे बंड हे राज्याच्या राजकारणातील उलटफेरां मधील मैलाचे दगड ठरतील. गेल्या अडीच तीन वर्षांच्या काळात झालेल्या या घडामोडीच्या उलटफेरांमुळे राज्यात सध्या शिंदे-फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात असलं तरी आणखी काही राजकीय भूकंप घडून येतो का? याबाबत सतत चर्चा काहीना काही चर्चा सुरु असतात. अशातच आता बच्चू कडू यांच्या १२ आमदार घेऊन बाहेर पडू म्हणणाऱ्या या एका विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडून येणार का? या चर्चांना उधाण आले असताना बच्चू कडू यांच्या सोबत फक्त २ आमदार असे म्हणत त्यांच्या या बोलण्यातली हवाच शिंदे गटाचे मंत्री दिपक केसरकर यांनी काढून घेतली.

बच्चू कडू म्हणाले….
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू व राणा दाम्पत्याचा वाद उभा महाराष्ट्र पहात आहे. हे दोन्ही आमदार सध्या शिंदे फडणवीस सरकार सोबत असताना अपक्ष आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्याबाबत केलेलं एक विधान ” ५० खोके एकदम ओके ” या विरोधकांनी आरोपांच्या आगीत तेल ओतणारे ठरले आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन ५० खोके घेतल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या रवी राणा यांनी केलेला आरोप बच्चू कडू यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे.आरोपामुळे तिळपापड झालेल्या बच्चू कडू यांनी थेट १२ आमदारांसह सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. ‘रवी राणांनी माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घ्यावा’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.तसेच १ तारखेला त्यांनी अमरावती येथील एका ठिकाणी ४ वाजे पर्यंत पुरावा सादर करावा असे अवाहनही रवी राणा यांना केले आहे.
पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळाले नसल्याने बच्चू कडू नाराज असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या, बच्चू कडू यांच्यासह अनेक वरीष्ट आमदार देखील नाराज होते त्यात्यावेळी त्यांच्या नाराजी उघड झालेल्या महाराष्ट्राने पाहील्या आहेत. याबाबत त्यांना विचारले असता ज्यांनी त्यांनी नाराजीच्या चर्चा नाकारल्या नव्हत्या. त्यामुळे आता बच्चू कडू खरंच सरकारचा पाठिंबा काढून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील का? अशी जोरदार चर्चा आता राज्यातील जनतेमध्ये सुरु झाली आहे.

काय म्हणतायेत केसरकर
बच्चू कडू हे जेष्ठ प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते असून, त्यांच्या बरोबर त्यांच्यासह दोन आमदार आहेत. बाकी अन्य आमदारांच्यावतीने ते काही म्हणत असतील तर, मला नेमकी वस्तुस्थिती माहिती नाही.मात्र लवकरच त्यांना मंत्रीपद मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे.पण जे आमदार मंत्री होणार आहेत, त्यांनी थोडा संयम ठेवायला हवा,” बच्चू कडू यांच्यासोबत त्यांच्यासह दोनच आमदार आहेत. असे दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *