Breaking News

विधानसभा अध्यक्षांच्या मनमानीच्या विरोधात विरोधकांचा अविश्वासाचा ठराव विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात होवून एक आठवडा झाला. तरीही विधानसभेत अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडून नियमानुसार कामकाज करण्यात येत नसल्याच्या मुद्यावर विरोधी बाकावरील सदस्यांशी सातत्याने खडाजंगी होत आहे. त्यामुळे अध्यक्ष बागडे यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात विधानसभेत अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली.

विधान भवनातील मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.

यावेळी विखे-पाटील म्हणाले, अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात राज्यपालांचे अभिभाषण झाले. नियमानुसार सभागृहात राज्यपालांच्या भाषणावर चर्चा होवून विरोधकांनी सूचविलेल्या सुचनांचा अंतर्भाव केला जातो. तसेच या चर्चेला मुख्यमंत्र्याचे उत्तर होते. मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनवी घातलेल्या गोंधळातच पुरवणी मागण्यावरील चर्चा आणि राज्यपालांचे अभिभाषण अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.

धनंजय मुंडे आणि प्रशांत परिचारक यांच्या मुद्यावरून सत्ताधारी पक्षातील शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज रोखून धरले असताना आज अध्यक्ष बागडे यांनी मागील कामकाज घेतले नाही. विरोधी पक्षातील सदस्य कामकाज नियमाने व्हावे यासाठी वारंवार वेल मध्ये येवून घोषणा देत अध्यक्षांचे लक्ष वेधत होते. मात्र अध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अशा पद्दतीने कामकाज करणे हा लोकशाहीचा खून आहे. लोकशाही उधवस्त करणे याचे द्योतक असल्याचा आक्षेप राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी यावेळी घेतला.

तसेच सभागृहात कामकाज न झालेल्या मुद्यावर सभागृहात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना नियमबाह्य पध्दतीने निवेदन करण्यास देणे यासह अनेक प्रश्नी अध्यक्षांचे हेतु पुरस्सरपणा दिसून येत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

याशिवाय गोंधळातच राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा मंजूर करणे, पुरवणी मागण्यांवरही चर्चा न करताच त्याही मंजूर करणे यासह शेतकऱ्यांची प्रश्न, गृह विभाग, महसूल विभागासारख्या महत्वाच्या विभागांवरील चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र त्यावर चर्चाच होवू द्यायची नाही आणि घ्यायची नाही असा चंग बागडे यांनी बांधल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

उद्योगमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार

एक मार्च रोजीच्या तारांकित प्रश्नोत्तरात नाणार प्रकल्पावरील प्रश्नाला सकारात्मक उत्तर दिले. मात्र सभागृहात त्या दिवशी प्रश्नोत्तराचा तास झाला नाही. त्यामुळे त्यावर निवेदन देणे चुकीचे होते. तरीही उद्योग मंत्र्यांनी पूर्वीच्या उत्तरापेक्षा वेगळे विरोधी निवेदन करत मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावे अशी सूचना केली. मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री असताना त्यांनाच त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री निर्णय घ्यावा अशी सूचना करतो यावरून विधानसभेची दिशाभूल करत असल्याचे दिसून येत असल्याने उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या विरोधात हक्कभंग ठराव आणणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.

Check Also

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत फक्त ४३ टक्के मतदान

महाराष्ट्रासह देशभरातील ८२ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *