Breaking News

भाजपाची दुसरी ७२ उमेदवारांची यादी जाहिरः महाराष्ट्रातून २० उमेदवार जाहिर

काँग्रेसने आपली दुसरी यादी जाहिर केल्यानंतर एक दिवसाचे अंतर ठेवून भाजपाने आज दुसरी ७२ उमेदवारांची यादी जाहिर केली. विशेष म्हणजे या भाजपाने पहिल्यांदा मुंबईतील २ उमेदवारांसह महाराष्ट्रातील १८ उमेदवार असे मिळून २० उमेदवारांची यादी जाहिर केली. मुंबई महाराष्ट्रातील २० उमेदवारांपैकी ५ महिला उमेदवार भाजपाने रिंगणात उतरवले आहे. तर पाच जणांची उमेदवारी कापत ५ नवे उमेदवार पहिल्यांदाच रिंगणात उतरविण्यात आले आहे.

यात विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांच्याऐवजी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नंदूरबार मधून डॉ हिना गावित यांना शिवाय जळगांव मधून उमेश पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. तसेच रक्षा खडसे यांनाही उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. त्याचबरोबर दिंडोरी मधून विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव अनूप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गिरीश बापट यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, तर चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांना नव्याने तिकिट देण्यात आले आहे.

तसेच भाजपाने दुसऱ्या यादीत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, अहमदनगरमधून डॉ सुजय विखे-पाटील, तर चंद्रपूरमधून हंसराज अहिर यांच्याऐवजी सुधीर मुनगंटीवार यांना तर मुंबईतून नेहमी राज्यसभेवर खासदार म्हणून निवडूण जाणारे पियुष गोयल मात्र पहिल्यांदाच लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर मुंबई उत्तर मधून मिहिर कोटेचा यांच्याऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तसेच पुणे येथून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना गिरिष बापट यांच्या जागेवरून तिकिट देण्यात आले आहे. लातूरमधून सुधाकर शृगांरे, तर माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंग हिंदूराव निंबाळकर आणि सांगलीतून संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

भाजपाची दुसरी यादी-महाराष्ट्रातील २० जणांची यादी जाहिर

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *